10 crore for Kundi Nairi Ghats in ratnagiri kokan martahi  news
10 crore for Kundi Nairi Ghats in ratnagiri kokan martahi news 
कोकण

आता आमदार निकम करणार मधु दंडवते यांचे ते स्वप्न पूर्ण..

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : हरपुडे-कुंडी आणि नायरी-निवळी घाट रस्त्यासाठी चिपळूण-संगमेश्‍वरचे आमदार शेखर निकम यांनी दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे. घाट रस्त्यासाठी आवश्‍यक वनजमीन सर्वेक्षण व भूसंपादन करून घेण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्यांसाठी माजी खासदार कै. मधु दंडवते यांनी आग्रह धरला होता. त्यामुळे निकम आता कै. मधु दंडवते यांचे स्वप्न पूर्ण करणार आहेत. 

आमदार निकमांचे प्रयत्न 

सध्या देवरूखमधील साखरपा येथून आंबा घाटमार्गे पश्‍चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी रस्ता आहे. देवरूख आणि संगमेश्‍वर पश्‍चिम महाराष्ट्राच्या अधिक जवळ यावे, यासाठी सिंधुदुर्गचे माजी खासदार कै. मधु दंडवते यांनी निवळी, पाचांब, नेरदमार्गे पाटण घाट रस्ता व्हावा, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला पुरेसे यश आले नाही. गेली अनेक वर्षे हा रस्ता लाल फितीत अडकला होता. आमदार शेखर निकम यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा-अबब ! एवढ्या रुपयांची दारु जप्त..... ​
संगमेश्‍वर पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणार

मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत शेखर निकम यांनी निवळी, पाचांबे, नेरदमार्गे पाटण घाट रस्त्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली. साखरपामार्गे पाटणला चिपळूणमार्गे किंवा कोल्हापूरमार्गे जावे लागते. त्यामुळे हा रस्ता झाल्यास सातारा जिल्हा संगमेश्‍वरच्या आणखी जवळ येणार आहे. हे निकमांनी पटवून दिले. त्याशिवाय कुंडी-हरपुडे घाट झाल्यास सांगली जिल्ह्यात सहज प्रवेश करता येणार आहे. मात्र, दोन्ही घाट रस्त्यांच्या मार्गावर शासकीय वनजमीन आहे. तिचे सर्वेक्षण करून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार निकम यांनी दहा कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. 

वनजमिनीचे सर्वेक्षण करून भूसंपादनासाठी.. 
संगमेश्‍वर, कसबा, नायरी, निवळी येथील वनजमिनीचे सर्वेक्षण करून भूसंपादनासाठी पाच कोटी, तसेच देवरूख, हरपुडे, कुंडी येथील जमिनीचे सर्वेक्षण करून भूसंपादन प्रक्रियेसाठी पाच कोटी मंजूर करण्यात आले आहेत. 

कुंडी आणि निवळी घाट रस्त्यासाठी माजी खासदार कै. दंडवते आग्रही होते. त्यासाठी आवश्‍यक वनजमीन ताब्यात येणे गरजेचे आहे. ही जमीन ताब्यात आल्यानंतर रस्त्यासाठी आवश्‍यक निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून उपलब्ध करून घेणार आहे. 
-शेखर निकम, आमदार  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT