12 Corona Positive Patient In Sawantwadi Sindhudurg Marathi News
12 Corona Positive Patient In Sawantwadi Sindhudurg Marathi News 
कोकण

सावधान ! सावंतवाडी तालुक्‍यात आढळले 12 कोरोनाग्रस्त 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील तालुक्‍यामध्ये रुग्ण संख्या वाढत असून आज ग्रामीण भागांमध्ये 7 आणि शहरी भागामध्ये 5 असे 12 रुग्ण सापडले आहेत. यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्‍याचे आतापर्यंत रुग्ण संख्या 375 एवढी झाली आहे. आज शहरातील खासकीलवाडा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

तालुक्‍यात वाढत असलेल्या रुग्णांचा आकडा आता लवकरच 400 चा आकडा पार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आज तालुक्‍यात 12 रुग्णांची भर पडली आहे. आज सापडलेला रुग्णांमध्ये शहरातील पांजरवाडा येथे दोन रुग्ण, बाहेरचावाडा येथे दोन रुग्ण आणि सबनीसवाडा येथे एका रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. असे शहरात एकूण पाच रुग्ण सापडले आहेत तर खासकीलवाडा येथील एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 14 रुग्णांना या आधी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागामध्येही कोरोना हात पाय पसरत असून आज दिवसभरात 7 रुग्ण सापडले आहेत.

यामध्ये आरोंदा येथे एक आजगाव-भोम येथे एक, निरवडे येथे दोन, माजगाव येथे एक, तळवडे येथे एक आणि बांदा येथे एक रुग्ण सापडला आहे. गेले काही दिवस कोरोनाचा ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता ग्रामीण व शहरी भागात जनता कर्फ्यू लावण्यात यावा, अशी नागरिकांतून मागणी होत आहे. याबाबत मतमतांतरे दिसून येत आहेत. तालुक्‍याचे रुग्णसंख्या 375 एवढे पोहोचले आहे तर मृत्यू होणार यांच्या संख्येतही वाढ होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT