12th Exam Result Konkan Divisional Board esakal
कोकण

12th Exam Result : कोकण मंडळ सलग 13 वेळा राज्यात अव्वल; बारावीचा 97.51 टक्के निकाल, पुन्हा मुलीच आघाडीवर

बारावीच्या परीक्षेत (12th Exam Result) कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या वर्षी महाराष्ट्रात बाजी मारली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गतवर्षी मंडळाचा निकाल ९६.०१ टक्के लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत मंडळाचा निकाल १.५ टक्के एवढा जास्त लागला आहे.

रत्नागिरी : बारावीच्या परीक्षेत (12th Exam Result) कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या वर्षी महाराष्ट्रात बाजी मारली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल (Online Result of 12th Exam) काल दुपारी १ वाजता जाहीर झाला. कोकण विभागीय मंडळाचा (Konkan Divisional Board) निकाल राज्यात अव्वल म्हणजे ९७.५१ टक्के लागला आहे. नेहमीपेक्षा यावेळी निकाल खूपच लवकर लागला असून, आता पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होणार आहे.

गतवर्षी मंडळाचा निकाल ९६.०१ टक्के लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत मंडळाचा निकाल १.५ टक्के एवढा जास्त लागला आहे. कोकण मंडळातून १२३९० मुले उत्तीर्ण झाले व मुली १२७६३ उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.४२ टक्के व त्यापेक्षा २.१८ टक्के जास्त मुलींचे प्रमाण ९८.६० टक्के आहे. नेहमीप्रमाणे मुलींनी या परीक्षेत अव्वल स्थान मिळवले आहे, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष महेश चोथे व प्रभारी सचिव सुवर्णा सावंत यांनी दिली.

कोकण मंडळात २२७२ विद्यार्थी ७५ टक्के व व पुढे ८४२६ विद्यार्थी ६० टक्के व पुढे ११७८३ विद्यार्थी ४५ टक्के व पुढे आणि २६७२ विद्यार्थी ३५ टक्के व पुढे गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १५४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९४ अशा २४८ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अनुक्रमे ३८ व २३ अशी ६१ मुख्य परीक्षा केंद्रे होती. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९७.५१ टक्के लागला आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ८०.३० टक्के लागला.

यात रत्नागिरी जिल्ह्यातील ६९० पैकी ५४२ विद्यार्थी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२४ पैकी १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळात रत्नागिरी जिल्ह्यात गैरमार्ग प्रकरणांची संख्या वाढली आहे. यंदा ९ प्रकरणे घडली व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही प्रकरण घडले नाही. गेल्या वर्षी रत्नागिरीत फक्त १ गैरमार्ग प्रकरण घडले होते. गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रतिसाठी २२ मे ते ५ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, त्यासाठी शुल्क आकारणी केली जाईल.

शाखानिहाय निकाल

शाखा उत्तीर्ण विद्यार्थी निकाल

  • विज्ञान ९३८४ ९९.००

  • कला ५२८१ ९३.७६

  • वाणिज्य ९३७६ ९८.४६

  • व्यावसायिक ८३६ ९६.६४

  • टेक्निकल सायन्स २७६ ९३.२४

श्रेणीसुधार, पुरवणी परीक्षा

बारावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह बसून उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. तसेच जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी २७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच सूचना जाहीर करण्यात येईल.

ताण कमी करण्यासाठी प्रयत्न

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत झाली होती. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एक दिवसाचा खंड ठेवला होता. शिवाय हे वेळापत्रक २ नोव्हेंबर २०२३ ला जाहीर केले होते. विद्यार्थ्यांना नकारात्मक विचार, भीती, मानसिक दडपण यातून बाहेर काढण्यासाठी मंडळ स्तरावर, जिल्हानिहाय समुपदेशक नेमले होते. तसेच नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन सुविधा दिली होती. परीक्षेच्या कालावधीत भरारी पथकेसुद्धा कार्यरत होती. राज्यात एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. खेळाडू, एनसीसी, स्काऊट, गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले आहेत, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.

कोकण मंडळ सातत्याने शिखरावर आहे, याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे अभिनंदन. मार्गदर्शन, सराव, नियोजन व परस्पर संवाद यामुळे कोकण पॅटर्नने महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आपले नाव अधोरेखित करून इतिहास निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडेही गांभीर्याने पाहावे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या तंत्रज्ञानाची भाषा अवगत केली पाहिजे.

-अॅड. विलास पाटणे, उपाध्यक्ष, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी

जिल्हा नोंदणी विद्यार्थी प्रविष्‍ठ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी

  • रत्नागिरी १६७७९ १६७२१ १६२३२ ९७.०७

  • सिंधुदुर्ग ९०९४ ९०७२ ८९२१ ९८.३३

  • एकूण २५८७३ २५७९३ २५१५३ ९७.५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT