14 Corona Positive Patient Found In Ratnagiri District
14 Corona Positive Patient Found In Ratnagiri District  
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात 14 नवीन कोरोना रूग्ण

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 14 कोरोनाबाधित सापडले आहेत तर 28 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकाही रुग्णाचा आज मृत्यू झालेला नाही. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या 144 वर पोचली आहे. तालुक्‍यातील पावस परिसरातील एका शाळेत हजर झालेले शिक्षक पॉझिटिव्ह निघाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला नसला तरी दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 171 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 14 कोरोना बाधित रुग्ण सापडले. 157 जणांना अहवाल निगेटिव्ह आला. यामध्ये आरटीपीसीआर 11 तर ऍन्टीजेन चाचणीत 3 रुग्ण आढळले. यामध्ये सर्वात जास्त रत्नागिरी तालुक्‍यात 8 रुग्ण आहेत,

खेड 2, गुहागर 2, संमेश्‍वर-देवरूख 2 रुग्ण. जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 864 पॉझिटिव्ह रुग्ण असून 55 हजार 377 जणांचा अहवाल निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 28 रुग्ण बरे झाले असून 8 हजार 351 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 94.21 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. एकूण कोरोना बळींची संख्या 321 असून मृत्यूदर 3.62 आहे. जिल्ह्यातील विविध कोरोना सेंटरमध्ये 144 रुग्ण उपचार घेत आहेत. 

पावस येथील एका शाळेत हजर झालेले शिक्षक पॉझिटिव्ह निघाल्याने आरोग्य यंत्रणेला पुन्हा काम लागले आहे. परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकाने कोरोना चाचणी न करता शाळेत हजेरी लावली. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांची कोरोनाची चाचणी केली असता चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पालकांची झोप उडाली आहे. 

* एकूण बाधित रुग्ण - 8864 
* बरे झालेले रुग्ण - 8351 
* एकूण निगेटिव्ह- 55377 
* एकूण मृतांची संख्या- 321 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT