150 Teachers Away Form Senior Post Sindhudurg Marathi News  
कोकण

सिंधुदुर्गात दीडशे शिक्षक वरिष्ठ श्रेणीपासून वंचित 

सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यातील 150 प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित आहेत. त्यांना ही वेतनश्रेणी मिळावी, अशी मागणी अखिल जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

जिल्हाध्यक्ष के. टी. चव्हाण, जिल्हा सचिव गुरुदास कुबल, चेतन गोडेकर, संदीप शेळके, विजय केळकर, पांडुरंग मोरये, राजा कविटकर, उदय गोसावी, पांडुरंग कोकरे आदी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात 2003 ते 2011 या कालावधीत प्राथमिक शिक्षक पदावर मागासवर्गीय प्रवर्गातील प्रशिक्षित उमेदवार उपलब्ध न झाल्याने अप्रशिक्षित बारावी उत्तीर्ण उमेदवार यांची प्राथमिक शिक्षक पदावर शासन आदेशाने नियुक्ती करण्यात आली. या शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी 4 ते 7 वर्षे एवढा कालावधी लागला.

परिणामी 12 वर्षे नियमित सेवा होवुनही वरिष्ठ वेतनश्रेणी करिता 12 वर्षे प्रशिक्षणानंतरचा कालावधी पूर्ण होत नसल्याने हे शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी पासून वंचित राहिले आहेत. शासनाने सुधारित आदेश काढून कर्मचाऱ्याने 12 वर्षाच्या नियमित सेवा कालावधीत आवश्‍यक अहर्ता धारण केल्यास त्याला 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतरच्या लगतच्या तारखेस अथवा 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतर अहर्ता धारण केल्यास अहर्ता धारण तारखेस वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशाप्रकारे कार्यरत असलेल्या शिक्षकांना याचा लाभ मिळावा. अशाप्रकारे जिल्ह्यात 150 पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत, असे या निवेदनात नमूद केले आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT