155 corona affected in Ratnagiri district in twenty four hours 
कोकण

चोविस तासात रत्नागिरी जिल्ह्यात 155 कोरोनाबाधित 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यात पुन्हा कोरोना फोफावला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 155 कोरोना रुग्ण सापडले आहे. वाढत्या रुग्ण संख्येने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची झोप उडाली आहे. जिल्ह्यात आज 54 जण करोनामुक्त झाल्याने असून एकुण बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 204 आहे. मात्र रुग्ण संख्या वाढल्याने रुग्ण बरे होण्याचा टक्का 4 टक्केने घसरला आहे. 

शिमगोत्सवाची आज सांगता होत असताना जिल्ह्यात कोरोना मात्र वाढताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन निर्बंध अधिक कडक करण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात आज नवीन 155 रुग्ण मिळाले आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 11 हजार 262 झाली आहे. यामध्ये आरटीपीसीआर 111 व आरएटी चाचणीत 44 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरी-56, दापोली-5, खेड-9, गुहागर -27, चिपळूण-35, संगमेश्‍वर-18, मंडणगड-1, लांजा-2, राजापूर -2 आहेत. प्रशासनाकडून गर्दी टाळा, मास्क वापरा यावर जनजागृती केली जात आहे. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या कोव्हॉक्‍सीन लस घेण्यास नागरिक स्वतःहून पुढे येत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी 673 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत 1 लाख 1 हजार 364 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 519 आहे. त्यातील सर्वाधिक 114 रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर 309 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज 54 जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या 10 हजार 204 झाली आहे. कोरोना मुक्तीचा 95 टक्के असलेला दर 90.60 टक्के खाली घसरला आहे. आज जिल्ह्यात आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या 377 असून जिल्ह्याचा मृत्युदर 3.35 टक्के आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आजचा भारत दहशतवाद सहन करत नाही’; ‘मन की बात’मधून PM मोदींचा थेट संदेश, नेमकं काय म्हणाले?

Bandhavgarh Elephant Festival: बांधवगड हत्ती महोत्सवात चिमुकल्या ‘कृष्णा’ची हवा; खोडकर खेळांनी जिंकली पर्यटकांची मने! काय आहे मुख्यमंत्र्यांशी कनेक्शन ?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

Child Safety Policy: शाळांमध्ये ‘स्मार्ट फोन’ बंदीची शिफारस,‘बिहेविअर चेंज’चा अहवाल; डिजिटल माध्यम वापरासाठी धोरणाचा आग्रह

SCROLL FOR NEXT