160 schools in Raigad district without teachers impact on student education  esakal
कोकण

Raigad School News : शिक्षणाचा बोजवारा; रायगड जिल्ह्यातील १६० शाळा शिक्षकांविना...

साडेतीन हजार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास महिना होत आला, तरी रायगड जिल्ह्यातील १६० शाळा शिक्षकांविना सुरू असल्‍याचे समोर आले आहे. या शाळांमध्ये तब्बल साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्‍यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्‍याने पालकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

ग्रामीण भागातील मुले शिकली पाहिजेत यासाठी शिक्षण विभागाने गाव तेथे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्‍यानुसार अनेक गावांमध्ये शाळाही सुरू केल्या आहेत, मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढीला चालना मिळत नसल्याने खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील पट संख्या कमी होऊ लागली.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे शाळेतील गुणवत्ता वाढीला गती मिळाली आहे. शाळांमधली पटसंख्या वाढण्याच्या स्थितीत असताना, जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत. काही शाळांमध्ये एकाच शिक्षक नियुक्‍त असून त्‍यांच्यावर चार-चार वर्ग सांभाळण्याची जबाबदारी आहे. तर काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे, पण शिक्षकच नसल्‍याने बाजूच्या गावातील शिक्षक नियुक्‍त करण्यात त्‍यांना दोन-दोन शाळांमध्ये शिकवावे लागत असल्‍याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यात शाळा १६० शाळा शून्य शिक्षकी आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याच्या सूचनेनुसार, अन्य शाळेतील शिक्षकांची मदत घेण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरून आलेल्या शिक्षकांची त्या ठिकाणी रवानगी केली आहे.

- पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, रायगड जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT