21 lakh rupees received from overload vehicle transport in sindhudurg 
कोकण

कोकण : सावंतवाडीत ओव्हरलोड वाहुतक करणाऱ्यांवर कारवाई; 21 लाखांची वसुली

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी ओव्हरलोड वाहतूक रोखताना येथील महसूल विभागाने वाळू, काळा दगड, जांभा दगड, माती आदींच्या वाहतुकीतून वर्षभरात तब्बल 21 लाख 70 हजार 966 रुपयांचा दंड वसूल केला. यात 16 डंपरवर ही कारवाई करण्यात आला, अशी माहिती नायब तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली. जिल्ह्यात अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाची बारकाईने नजर आहे. दिवसा व रात्री चोरट्या पद्धतीने होणारी वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथकच तैनात असते. त्यामुळे बऱ्याचवेळा अनधिकृत वाहतुकीवर कारवाई करुन महसुलकडून एकप्रकारे अशा वाहतुकीला चाप लावण्यात येतो. 

ओव्हरलोड तसेच अनधिकृत बिनापास होणाऱ्या वाहतुकीवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून आवाज उठवताना कारवाईची मागणी वेळोवेळी होते. तालुक्‍यात काळा दगडाच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. या खाणीतून होणारे दगड उत्खनन महसुलची नजर चुकवून ओव्हरलोड पद्धतीने केली जाते. चोरट्या पद्धतीची वाळू वाहतुकही होते. चोरट्या पद्धतीच्या वाळूचे दर हे कमी असल्याने त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळेच अशी वाळू वाहतुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात सऱ्हास केली जाते. जांभा दगडही ओव्हरलोड पद्धतीने बऱ्याचवेळा वाहतूक केला जातो. त्यामुळे बऱ्याच डंपर मालकांना महसूलच्या कारवाईला सामोरे जावे लागते. 

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या सूचनेनुसार महसूलचे पथक अशा वाहतुकीवर करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत अशा अनधिकृत तसेच ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करताना तब्बल 21 लाख 17 हजार 966 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये एकूण 16 डंपरवर कारवाई करण्यात आली आहे. दोन डंपर अद्यापही येथील महसूलच्या ताब्यात असून ते सडत आहेत. अलीकडेच चार डंपरवर वाळूची चोरट्या पद्धतीने वाहतूक करताना कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी एक डंपर तहसील कार्यालय परिसरातून चोरून नेला असून त्याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वर्षभरातील कारवाई 

तीन डंपर अद्यापही महसूलच्या ताब्यात असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. वर्षभरामध्ये झालेल्या कारवाईमध्ये अनधिकृत वाळूच्या माध्यमातून 10 लाख 21 हजार 116 रुपयांचा दंड, काळा दगड वाहतुकीतून आठ लाख 53 हजार 300 रुपये तर जांभा दगड वाहतुकीतून दोन लाख 43 हजार 550 रुपये दंड वसूल करण्यात आला.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

SCROLL FOR NEXT