22 chicks of Cobra found in sindhudurg malvan
22 chicks of Cobra found in sindhudurg malvan 
कोकण

मोठी बातमी ; राज्यातील पहिलीच घटना; एकाच ठिकाणी सापडली कोब्राची तब्बल २२ पिल्ले

सकाळ वृत्तसेवा

मालवण : तालुक्यात तारकर्ली येथे एकाच ठिकाणी कोब्रा जातीची काल तब्बल २२ पिल्ली तर आज एक अशी २३ पिल्ले आढळून आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पिल्ले मिळण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सिंधुदुर्ग या संस्थेच्या सदस्यांनी या पिल्लांची सुटका करत त्यांना वनविभागाकडे सुपूर्द केले आहे.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. 

तारकर्ली येथे प्रवीण मयेकर यांच्या गणेशमूर्ती शाळेत नाग जातीचे पिल्लू दिसल्याची माहिती वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू टीमचे उपाध्यक्ष आनंद बांबर्डेकर यांना स्थानिकांनी दिली. त्यानुसार त्यांच्या टीमचे सदस्य गणेशमूर्ती शाळेत दाखल झाले. त्यांनी शोध घेतला असता नाग जातीचे एक पिल्लू आढळून आले. त्याची सुटका बांबर्डेकर यांनी केली. त्यानंतर आणखी एक, एक पिल्लू अशी एकूण २२ पिल्ले आढळून आली. ही माहिती मिळताच वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू टीमचे अध्यक्ष अनिल गावडे, सचिव वैभव अमृस्कर आणि नंदू कुपकर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सापडलेल्या या नाग जातीच्या पिल्लांना वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सिंधुदुर्गच्या टीमने पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, वनरक्षक तारिक फकीर, वनमजूर अनिल परब यांनी त्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले. 

आतापर्यंत नागजातीची एकाच ठिकाणी जास्तीजास्त १३ ते १४ पिल्लेच आढळल्याची नोंद आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी नाग जातीची २२ पिल्ले सापडणे हा राज्यातील विक्रम असल्याचे वाईल्ड लाईफ संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी सांगितले. दरम्यान, आज सायंकाळी आणखी एक पिल्लू आढळून आले. आनंद बांबर्डेकर, नंदू कुपकर यांनी त्या पिल्लास पकडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT