22 students stuck in quota Admitted reached in ratnagiri 
कोकण

अखेर 40 तास प्रवास करून कोटात अडकलेले 22 विध्यार्थी आले रत्नागिरीत...

राजेंद्र शेळके

रत्नागिरी : राजस्थान येथील कोटा येथे अडकलेले 22 विद्यार्थी आज लालपरीच्या माध्यमातून (एसटी) कोकणात दाखल झाले. यामध्ये रत्नागिरीतील 19 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यांची आरोग्य तपासणी करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मात्र विद्यार्थी सुखरूप घरी पोचल्याने पालकांनी शासनाचे आभार मानले आहेत.

 कोटात अडकलेले 22 विद्यार्थी दाखल
राजस्थान कोटा येथून जिल्ह्यातील 22 विद्यार्थ्यांना एसटीतून जिल्ह्यात सुखरूप आणण्यात आले. हे विद्यार्थी शिक्षणासाठी कोटा येथे गेले होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउमध्ये ते अडकले होते. त्यांना महाराष्ट्रात आणण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. त्यानुसार आज ते रत्नागिरीत दाखल झाले. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 9, खेड 1, दापोली 2, रत्नागिरी तालुक्यातील 6 आणि सिंधुदुर्ग येथील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

खेड, मंडणगड, दापोली येथील विद्यार्थ्यांना आज सकाळी कळंबणी रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. तर रत्नागिरीतील 6 विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे. त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यात येणार आहे. धुळे डेपोच्या गाडीने हे सर्व विद्यार्थी आणण्यात आले. ते  सुखरूप पोचल्याने पालकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?

Vishal Garg Ousted : ज्या CEO ने ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरुन काढलं, त्यालाच आता नोकरी मागायची आली वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

SCROLL FOR NEXT