ब्रेललिपीत देवस्थानवरील पुस्तिकेचे प्रकाशन
ब्रेललिपीत देवस्थानवरील पुस्तिकेचे प्रकाशन sakal
कोकण

कड्यावरील श्री गणपती उत्सवाचे २४१ वे वर्ष

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजर्ले येथे माघी गणेशोत्सव २ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो ५ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार असल्याची माहिती देवस्थानाकडून देण्यात आली आहे. यंदाचे हे माघी गणेशोत्सवाचे २४१ वे वर्ष आहे.

सहस्त्रावर्तने गणेशयाग, सकाळी ७.३० वा. श्री गणेश याग, संकल्प पुण्यहवाचन, सकाळी १० वा. देवता स्थापना व गणपती अथर्वशिर्ष सहस्त्रावर्तने, सकाळी ११ वा. अग्नीस्थापना, ग्रहस्थापना, ग्रहयज्ञ, आरती, दुपारी ३ वा. हळदीकुंकू, संध्या. ४ वा. श्री दुर्गादेवी महिला भजनमंडळ, उभागर यांचे भजन, संध्या. ७.३० वा. श्री गुरुदेवदत्त भजन मंडळ, आंजर्ले (उभागर) यांचे भजन असे कार्यक्रम पार पडले. गुरुवारी (ता. ३) फेब्रुवारीला सकाळी ८.३० वा. श्री गणेशयाग, हवन, बलिदान, पुर्णाहूती, अभिषेक यज्ञसमाप्ती, आरती, मंत्रपुष्पांजली, दुपारी ३.३० वा. देशभक्तीपर समूहगान स्पर्धा, संध्याकाळी ५ वा. बक्षीस समारंभ, सर्पमित्र माहिती, संध्याकाळी ५.३० वा. अंध मुलांनी तयार केलेले ब्रेललिपीतील कड्यावरील श्री गणपती देवस्थान माहिती पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा, संध्याकाळी ७.३० वा. विमलेश्‍वर भजनमंडळ, मुर्डी यांचे रात्री ८.३० वा. श्री दत्तगुरु प्रासादिक भजनमंडळ, बिरवाडी आंजर्ले यांचे भजन असे कार्यक्रम झाले.

शुक्रवारी (ता. ४) सकाळी ८ वा. संत ज्ञानेश्‍वर माऊली वारकरी सांप्रदाय भजन मंडळ, पाजपंढरी यांच्या दिंडीचे आगमन व भजनसेवा, सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वा. हभप विजय निजसुरे यांचे कीर्तन, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, संध्या. ६ वा. जय हनुमान भजनमंडळ, ताडाचा कोंड यांचे भजन, संध्याकाळी ७.३० वा. कालभैरव भजनमंडळ, बिरवाडी यांचे भजन, रात्री ८.३० वा. श्री दत्तगुरु प्रासादिक मंडळ, कातळकोंड येथील भजन, रात्री १०.३० वा. श्री विठ्ठल प्रासादिक भजनमंडळ भंडारवाडा येथील भजन, शनिवारी (ता. ५) रात्री १० वा. ''गणराज रंगी रंगला'' हा लळिताचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

SCROLL FOR NEXT