25 Lakhs Award To Sindhudurg ZP Marathi News
25 Lakhs Award To Sindhudurg ZP Marathi News 
कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला 25 लाखांचे बक्षीस

सकाळ वृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - 2018 - 19 या आर्थिक वर्षात यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात प्रथम ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला आज 25 लाख रुपयांचा धनादेश व सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात आले.

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. तसेच याच अभियानात पंचायत समिती स्तरावर राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कुडाळ पंचायत समितीलाही याच मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याचे 15 लाख रुपयांचे व कोकण विभागातील प्रथम क्रमांकाचे 9 लाखांचा धनादेश, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देण्यात आले. कोकण विभागात द्वितीय आलेल्या मालवण पंचायत समितीलाही 7 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. 

ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होते. हा पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी संयुक्त स्वीकारला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे आदी उपस्थित होते. 

यशवंत पंचायत राज अभियान 2018 - 19 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने तिहेरी यश संपादन केले होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने राज्यातील जिल्हा परिषदांत तर कुडाळ पंचायत समितीने राज्यातील पंचायत समित्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. मालवण पंचायत समिती कोकण विभागात द्वितीय आली होती. 28 फेब्रुवारीला राज्य शासनाने हा निकाल जाहीर केला होता. आज जिल्हा परिषदेसह कुडाळ पंचायत समितीला राज्यात प्रथम क्रमांकाचा तर मालवण पंचायत समितीला कोकण विभागात द्वितीय क्रमांकाचा सन्मान देण्यात आला. 

बक्षीस रक्कमेत 25 लाखांनी वाढ 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यशवंत पंचायत राज अभियानमध्ये 2006 - 07 मध्ये कोकण विभागात प्रथम व राज्यात तिसरी आली होती. 2013-14 मध्ये कोकण विभागात प्रथम व राज्यात तिसरी, 2014-15 मध्ये कोकण विभागात प्रथम व राज्यात तिसरी, 2017-18 मध्ये कोकण विभागात प्रथम व राज्यात दुसरी असा क्रमांक मिळविला आहे. या चार वर्षात जिल्हा परिषदेला 39 लाख रुपयांची बक्षीसे मिळाली आहेत. आता 2018-19 मध्ये जिल्हा परिषद प्रथम आली आहे. यासाठी 25 लाखांचे राज्यस्तर बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे या अभियानातील एकूण बक्षीस रक्कमेत 25 लाखांनी वाढ झाली आहे. 

मालवणला 7 लाखांचे बक्षीस 

मालवण पंचायत समितीने कोकण विभागात द्वितीय क्रमांक मिळविला होता. या पंचायत समितीला 7 लाखांचा धनादेश दिला. मालवण पंचायत समिती 2012-13, 2013-14, 2014-15 कोकण विभाग द्वितीय क्रमांक आली होती. 2015-16 कोकण प्रथम क्रमांक येत राज्यात तृतीय आली होती. त्यानंतर 2016-17, 2017-18 व 2018-19 मध्ये कोकण विभागात द्वितीय आली आहे. 

कुडाळला 26 लाखांचे बक्षीस 

कुडाळ पंचायत समितीचा 2018-19 या आर्थिक वर्षात कोकण विभागात प्रथम व राज्यात पंचायत समितीचा प्रथम क्रमांक आला होता. कोकण विभाग प्रथम क्रमांकाचे 9 लाख रूपये तर राज्यात प्रथम आल्याचे 17 लाख रुपये असे मिळून 26 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT