25 ton bumper watermelon one and half acre sakal
कोकण

दीड एकरात २५ टन बंपर कलिंगड

ताम्हाणेतील तरुणांचा प्रयोग; हंगामाआधीच उपलब्ध

संदेश सप्रे

देवरूख : कलिंगड म्हटले की, कोकणातील शिमगोत्सवाची आठवण होते. कारण याच कालावधीत कलिंगड मोठ्या प्रमाणात विक्रीला येते. नजीकच्या ताम्हाणेत मात्र जानेवारी महिन्यातच कलिंगड विक्रीला आले असून तीन तरुणांनी भाड्याच्या दीड एकर जागेत तब्बल २५ टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. त्यातील १५ टन विक्रीसाठी तयार झाले आहे.

कोकणच्या लाल मातीत मेहनत घेतली तर सोनंसुद्धा पिकू शकते, हे आता सिद्ध होऊ लागले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नजीकच्या ताम्हाणे गावातील श्रीकांत तटकरे, अमर तटकरे, प्रसास खाके या तीन तरुणांनी ताम्हाणे-कोसुंब गावच्या सीमेजवळ दीड एकर जागा भाड्याने घेतली. जागेची योग्य मशागत करून तिला कंपाउंड केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सांगली येथून मेलोडी जातीचे कलिंगड रोप आणण्यात आले. २० नोव्हेंबरला याची लागवड झाली. प्रत्येक वाफ्यात किमान २०० अशी एकूण ८४०० रोपे लावण्यात आली. वाफ्यावर प्लास्टिकचे आच्छादन करण्यात आले तर संपूर्ण परिसरात ठिबक सिंचन वापरण्यात आले. यातून रोपांवर गवत वाढले नाही आणि पाणी योग्यरित्या मिळाले. सेंद्रिय खतांचा योग्य वापर करण्यात आला. केवळ २ महिने ५ दिवसांत म्हणजेच २५ जानेवारीला या ठिकाणी कलिंगड विक्रीला उपलब्ध झाली. पहिल्या टप्प्यात १५ टनांची काढणी झाली असून अजूनही शेतात १० टन कलिंगड तयार होत आहे. यामुळे हे एकूण उत्पादन तब्बल २५ टनांवर जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात मेलोडी जातीची लागवड झाली असली तरी हंगाम अजून शिल्लक आहे. त्यामुळे पुढील १० दिवसांत याच जागेत अन्य दोन जातींची कलिंगड लागवड केली जाणार आहे. त्याचेही उत्पादन २ महिन्यांत होणे शक्य असल्याचे या तिघांनी सांगितले.केवळ कलिंगडच न लावता शिल्लक जागेत या तरुणांनी काकडी, वांगी, मिरची, भेंडी अशा भाज्यांची उत्पादनेही घेतली असून याला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आत्तापर्यंत आम्हाला यासाठी दीड लाख रुपये खर्च आला. खर्चाच्या तुलनेत विक्री चांगली आहे. त्यामुळे आम्ही आणखी दोन जातींची लागवड करणार आहोत. पडीक असलेल्या जमिनींचा असा वापर झाल्यास आपल्याकडे शेतीतून सधनता वाढेल आणि तरुणांना नोकरी करावी लागणार नाही.

- श्रीकांत तटकरे, तरुण शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

Tata Motors: टाटा मोटर्सचा शेअर 40 टक्क्यांनी घसरला; शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

Kolhapur Youth Accident : आयुष्याचा शेवट एका स्पीड ब्रेकरमुळे झाला, २४ सत्यजित बाबतीत घडलं विपरीत

Nashik Crime : भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई! १८ गुन्हे दाखल असलेल्या तडीपार सागर कुमावतला वणी गडावरून घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT