28 passengers injured in bus-container collision kokan news marathi news
28 passengers injured in bus-container collision kokan news marathi news 
कोकण

थरारक! २५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटीला मोठा अपघात;  मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) :  मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीनजीक एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. २५ विद्यार्थी व ३ प्रवासी असलेली एसटी बसच्या अपघाताने अक्षरश: बघ्यांच्या अंगावर काटा आणला. कशी घडली नेमकी ही थरारक घटना?

विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयानजीक प्रवाशी घेण्यासाठी तुळशी -खेड ही वस्तीची बस परतीच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला थांबली असता मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या कंटेनरने एसटीला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या ४६ प्रवाशांपैकी २८ प्रवासी जखमी झाले. यामध्ये अमिषा संतोष पाटील या विद्यार्थिनीला अधिक उपचारासाठी चिपळूण येथे दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना एसटीचे वाहक संजय साळवी यांच्यासह जखमी उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

एकूण २८ प्रवाशी जखमी 
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणीनजीक तुळशी-खेड एसटी बसला (क्र. एमएच. २०. बीएल. २५८०) गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने (क्र.-एमएच. ४७. बीबी. ४७३१) पाठीमागून धडक दिल्याने बसमधील वाहकासह २५ विद्यार्थी व ३ प्रवासी असे एकूण २८ प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात महामार्गावर  कळंबणी येथे आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच आमदार योगेश कदम यांनी आरोग्य यंत्रणा व पोलिस प्रशासनाला घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले. आमदार योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांची त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT