Chemical Factory Chimney Collapsed esakal
कोकण

Chemical Factory Chimney Collapsed : रासायनिक कारखान्याची तब्बल 32 मीटर उंचीची चिमणी कोसळली; कोट्यवधींचे नुकसान

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला (Lote Parshuram Industrial Estate) पाऊस व वादळीवारा यांचा जोरदार फटका बसला.

सकाळ डिजिटल टीम

पाऊस (Khed Rain) आणि वादळी वाऱ्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक छोट्या मोठ्या कारखान्यांना फटका बसला. अनेक छोट्या मोठ्या कारखान्यांचे पत्रे उडाले.

खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला (Lote Parshuram Industrial Estate) पाऊस व वादळीवारा यांचा जोरदार फटका बसला. औद्योगिक वसाहतीमध्ये श्रेयस इंटर मिजिएट या रासायनिक कारखान्याची (Chemical Factories) ३२ मीटर उंचीची चिमणी कोसळून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

पाऊस (Khed Rain) आणि वादळी वाऱ्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक छोट्या मोठ्या कारखान्यांना फटका बसला. अनेक छोट्या मोठ्या कारखान्यांचे पत्रे उडाले. श्रेयस इंटरमिजिएट लिमिटेड (Shreyas Intermediate Limited) या रासायनिक कारखान्याची ३२ मीटर उंचीची थर्मिक फ्लुईड चिमणी कारखान्याच्या आवारातील इतर तीन इमारतींवर कोसळली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी व कामगार जखमी झाले नाहीत.

मात्र या तीन इमारतींचे आणि चिमणीचे असे मिळून सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे जनरल मॅनेजर अनंत महाडिक यांनी सांगितले. कारखान्यामधील आणखी काही इमारतींचे पत्रे उडून दूरवर फेकले गेले. परंतु सुदैवाने कोणी कामगार जखमी झाले नाहीत. वादळी वाऱ्याचा जोर एवढा प्रचंड होता की एवढी मजबूत बांधकाम असलेली थर्मिक फ्लूईडची चिमणी कोसळून पडली आणि तीन इमारतींचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घडलेल्या घटनेबाबत संबंधित यंत्रणांना आम्ही वेळीच कळविले आहे असेही महाडिक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT