356 unmasked Punitive action against pedestrians covid 19 marathi kokan news 
कोकण

सावधान : कोकणात एका दिवसात  356 व्यक्तींवर झालीय दंडात्मक कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आज दिवसभरात 356 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये महसूल विभागाने काल (ता. 24) एका दिवसात 31 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 7 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पोलिसांनी 268 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 53 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगर पालिका क्षेत्रामध्ये 55 व्यक्ती या विनामास्क आढळून आल्या असून त्यांच्याकडून एकूण 11 हजार रुपये दंड वसूल केला आहे. जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये 2 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही 72 हजार 400 रुपये इतकी आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 136 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 4 ठिकाणी कोविडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Sangli Miraj Kupwad Politics : जयंत पाटील–विश्वजीत कदम–विशाल पाटील एकत्र; महायुतीचा गेम! दोन माजी महापौरांना लावले गळाला

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT