39 lakh rupees received from bank beneficial for 28 people sadavali ratnagiri 
कोकण

बॅंकेकडून मिळाले ३८ लाख ; स्वयंरोजगारासाठी झाला फायदा

सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) : देवरूख नगरपंचायतद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजनेचा फायदा नागरिकांना होत आहे. स्वयंरोजगार वैयक्‍तिक या गटात २८ लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी बॅंकेमार्फत ३८ लाख ९२ हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. यापुढे ज्या लाभार्थ्यांना बॅंक अर्जाची आवश्‍यकता आहे त्यांनी नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी गरीब नागरिकांना उपजीविकेच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंरोजगार वैयक्‍तिक या उपांगात देवरूख शहरातील सुधाकर किर्वे, चेतन खाके आणि वसंत बडद यांना रिक्षा व जनरेटर खरेदीसाठी बॅंक आफ महाराष्ट्र आणि बॅंक आफ इंडिया यांच्यामार्फत अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. 

भाजप नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या कार्यकाळात व पाठपुराव्यामुळे ६० महिला स्वयंसाहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली असून ५१ गटांना नगरपंचायतीमार्फत प्रतिगट दहा हजार रुपयेप्रमाणे ५ लाख १० हजार रुपये फिरता निधी देण्यात आलेला आहे. तसेच शहरातील महिला ५८ स्वयंसाहाय्यता गटांना विविध बॅंकेमार्फत ७३ लाख ८५ हजार रुपये तर पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कोरोना कालावधीतील विस्कळित झालेला व्यवसाय पुन्हा सुरू करणे कामी देवरूख शहरातील सर्वेक्षण झालेल्या ७९ फेरीवाल्यांना १० हजार रुपयेप्रमाणे ७ लाख ९० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ७ टक्‍के व्याज अनुदान शासनातर्फे दिले जाणार आहे. रिक्षा आणि जनरेटर वितरण सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, मुख्याधिकारी बालाजी लोंढे, नगरसेविका रेश्‍मा किर्वे, नगरसेवक राजेंद्र गवंडी, वैभव कदम व सहाय्यक प्रकल्प अधिकारी कुमार सरवदे उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kinder Joy: सावधान! किंडर जॉयमध्ये आढळले घातक बॅक्टेरिया; WHO सतर्क, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

BCCI Umpire Salary : खेळाडू तुपाशी पण अंपायर उपाशी! गेल्या ७ वर्षांपासून मानधन तेवढंच, अंपायरला एका सामन्याचे किती पैसे मिळतात?

Latest Marathi News Live Update : घंटागाडीतून निर्माल्याची विल्हेवाट! पालिका सहाय्यक आयुक्त विरोधात कारवाईची मनसेकडून मागणी

Sangli Municipal : ‘माझा प्रभाग, माझा अधिकार’च्या घोषणांनी भाजपमध्ये खळबळ; सांगलीत उमेदवारीवरून संघर्ष टोकाला

Kolhapur Muncipal : विकासाच्या नावाखाली टक्केवारीचा खेळ; कोल्हापूर शहराची घुसमट उघड चर्चेत

SCROLL FOR NEXT