4 buses in rural areas started on an experimental basis stoped 
कोकण

कोकणात आता या गावात धावनार नाही एस.टी....

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील ४ बसफेऱ्यांना प्रतिसाद न मिळाल्यास या फेऱ्या बंद करण्यात येणार असल्याची माहिती  आगारप्रमुख प्रशांत  करवंदे यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च पासून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत  तालुक्यातील ११ गावांमध्ये आढळलेल्या कोरोना बाधितांमुळे वाड्यांमध्ये कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी येथील एस.टी. आगार प्रशासनाने कन्टेनमेंट झोनमध्ये असलेल्या गाव-वाड्यांमध्ये एस.टी.बस न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात आगारातून अन्य तालुक्यातील चार मार्गांवर एसटी वाहतूक सुरू झाली आहे. यानंतर ग्रामीण भागात ४ मार्गावर बसफेऱ्या धावत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार २२ मे पासून खेड आगाराने तालुक्यातील ग्रामीण भागातील एस.टी.वाहतूक वगळून केवळ दापोली, मंडणगड, चिपळूण, रत्नागिरी मार्गावर ९ फेऱ्या सुरू केल्या होत्या. यानंतर १३ जूनपासून प्रायोगिक तत्वावर तालुक्यातील ४ गावांमध्ये बसफेऱ्या चालवण्यात येत आहेत.

तालुक्यातील पन्हाळजे, अणसपुरे, भडवळे, शेल्डी या मार्गावर बसफेऱ्या धावत आहेत. यामध्ये सकाळी ७.३० व दुपारी ३ वाजता खेड-पन्हाळजे, सकाळी ८ वाजता व दुपारी २ वाजता खेड-अणसपुरे, सकाळी ८.१५ व दुपारी ३ वाजता खेड-भडवळे, सकाळी  ८.४५ व दुपारी ३.३० वाजता खेड-शेल्डी या फेऱ्याचा समावेश आहे तर दुपारी १२ वाजता खेड-दापोली मार्गावर एक फेरी वाढवण्यात आली आहे. अणसपुरे येथील रस्ता खराब झाल्याने या मार्गावर धावणाऱ्या दोन बसफेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील तळे, शिवतर, कर्टेल, खवटी, होडखाड, भोस्ते, खोपी, मुरडे, चाकाळे, जामगे, अलसुरे या गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळल्याने या परिसरात कन्टनमेंट झोन जाहीर करण्यात आला. खबरदारी म्हणून एसटी प्रशासनाने या गावांमध्ये एसटी बस न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT