राजापूर (रत्नागिरी) : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तो आता सरपंचपदाच्या निवडणुकीच्या कुरघोडीला सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतींतील सरपंच निवड झाली असून बुधवारी (ता.10) 45 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंपदाच्या निवडणूका होणार आहे. सरपंच निवडीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.
सकाळी 10 ते 12 वा. उमेदवारी अर्ज दाखल करणे, 12 वा. अर्ज छाननी आणि 2 वा. सरपंच निवडणूक असा कार्यक्रम राहणार आहे. सार्वत्रिक निवडणूका झालेल्या 51 ग्रामपंचायतींपैकी तब्बल चाळीस ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्वाचा दावा केला आहे. त्यानंतर भाजप, कॉंग्रेससह मनसेनेही वर्चस्वाचा दावा केला आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाने सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचे पत्ते कापले गेले आहेत. सर्वच ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातून शह-काटशहाचे राजकारण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - सात नगरसेवक पक्षप्रवेश शक्यतेने वैभववाडीत वातावरण तापले ; गोपनीय बैठका सुरू
सरपंचपदाच्या निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायती
शिळ, धोपेश्वर, गोवळ, उन्हाळे, गोठणे दोनिवडे, चिखलगाव, कोदवली, ओणी, कोंडीवळे, मंदरूळ, चुनाकोळवण, पन्हळेतर्फे सौंदळ, मोसम, पांगरे बु., ससाळे, दोनिवडे, हरळ, रायपाटण, करक, येरडव, कार्जिडा, कोळंब, मिळंद, हातदे, मोरोशी, सौंदळ, ताम्हाणे, तुळसवडे, फुपेरे, परटवली, ओशिवळे, आडवली, आंबोळगड, सोलगाव, शिवणेखुर्द, वाडापेठ, कशेळी, कुंभवडे, पडवे, महाळूंगे, तारळ, वाल्ये, अणसुरे, कुवेशी, दळे, निवेली यांचा समावेश आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.