5 more fight on Coronaviras in ratnagiri 
कोकण

दिलासादायक : नर्सिंग कॉलेजच्या नर्स सह 4 जणांनी केली कोरोनावर मात...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात चाकरमान्यांच्या वाढत्या लोंढ्यामुळे कोरोना बाधितांची संख्या शंभरीकडे निघाली आहे. या चिंतेबरोबर आता दिलासा दायक म्हणजे काल पुन्हा 5 जणांनी कोरोनावर मात करीत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये नर्सिंग कॉलेजच्या त्या नर्सचाही समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


जिल्ह्यात चाकरमान्यांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, पुण्यातून पास घेऊन आलेल्या चाकरमन्यांना रत्नागिरीच्या सीमेवर रोखले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी आहे. हे लोंढे थांबविण्यास पोलिसांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्याची संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची क्षमताही संपल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरी हे लोंढे थांबत नसल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये पाच, सहा, अकरा या पटीत दिवसाला रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या 92 वर गेली आहे. कधीही 100 पार करण्याची शक्यता आहे.

डॉ. बोल्डे; नर्सिंग कॉलेजच्या नर्ससह चौघांचा समावेश  
मात्र यात दिलासादायक म्हणजे गेल्या चार ते आठ दिवसांमध्ये कोरोनावर मात करणार्‍यांची संख्याही चांगली वाढली आहे. आतापर्यंत आठ ते दहा जणांनी कोरोनावर मात गेली हाती.
काल पुन्हा 5 जणांनी कोरोनावर यशस्वी मात करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाआहे. सुरवातीला राजीवडा आणि साखरतर भागात सापडलेल्या कोरोना बाधित भागाचा सर्व्ह या नर्सने केला होता. त्यानंतर तिलाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली. तिच्या समवेत राहणार्‍या तिच्या 3 सहकारी नर्सचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण होते मात्र आता यातील पहिली प्रशिक्षित नर्स पूर्णपणे बरी झाली असून इतर 3 नर्स यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे, अशी माहिती असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बोल्डे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातसाठी खास जीआर, मराठवाड्याच्या हक्काचं ३९ लाख लीटर पाणी दिलं संस्थानला; ४८ किमी पाइपलाईन, पायघड्या कुणाच्या आशीर्वादाने?

Team India Schedule: टीम इंडिया इंग्लंडपूर्वी जाणार 'या' देशाच्या दौऱ्यावर; BCCI ने जाहीर केलं T20I मालिकेचं वेळापत्रक

Sangli ZP Election Politics : 'भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्षे आणि किती वेळा उंबरे झिजवले, याचा मी साक्षीदार'; संजय पाटलांचा जयंत पाटलांबाबत मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update : मालेगावात रमजान ईद उत्साहात; १२ ईदगाहांवर सामूहिक नमाज, शांततेत साजरी

Success Story : नोकरी सांभाळून शेतीतून लाखोंची कमाई! दापोलीच्या 'या' अवलियाने पारंपरिक शेतीचा चेहराच बदलला

SCROLL FOR NEXT