51 Gram Panchayat Election In Rajapur In May Ratnagiri Marathi News  
कोकण

राजापुरात 51 ग्रामपंचायतीच्या निवडणूका मे मध्ये  

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूका मे मध्ये होणार आहेत. 156 प्रभागातील 399 जागांसाठी लढती होणार आहेत. त्या जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत 4 फेब्रुवारीला विशेष ग्रामसभेमध्ये होणार आहे. 

51 ग्रामपंचायतींच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची मुदत जुलै ते डिसेंबर दरम्यान संपणार आहे. त्या ग्रामपंचायतींच्या मे महिन्यामध्ये निवडणूका होतील. यामध्ये शिळ, धोपेश्‍वर, गोवळ, उन्हाळे, गोठणे दोनिवडे, चिखलगाव, कोदवली, ओणी, कोडींवळे, मंदरूळ, चुनाकोळवण, पन्हळेतर्फे सौंदळ, तळगांव, मोसम, पांगरे बु. ससाळे, दोनिवडे, कारवली, हरळ, रायपाटण, करक, पांगरीखुर्द, येरडव, कार्जिडा, कोळंब, मिळंद, जवळेथर, हातदे, मोरोशी, सौंदळ, ताम्हाणे, तुळसवडे, फुपेरे, परटवली, ओशिवळे, आडवली, आंबोळगड, सोलगाव, शिवणेखुर्द, वाडापेठ, कशेळी, कोंडसर बु., कुंभवडे, पडवे, महाळूंगे, तारळ, वाल्ये, अणसुरे, कुवेशी, दळे, निवेली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू केली आहे.

156 प्रभागातील 399 जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रभागातील जागानिहाय आरक्षण सोडत होणार आहे. त्यासाठी 4 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदस्यांचे महत्व वाढले 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सरपंचांची थेट लोकांमधून निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. महाआघाडीने थेट सरपंच निवड करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे सरपंच निवड थेट लोकांमधून सरपंच निवड होणार नसून पूर्वीप्रमाणे सदस्यांमधून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा एकदा महत्व वाढले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT