544 turtle chicks released into the sea 
कोकण

तब्बल 544 कासवांची पिल्ले समुद्राच्या कुशीत..

सुधीर विश्‍वासराव

पावस (रत्नागिरी) :  रत्नागिरी तालुक्यातील गावखडी किनार्‍यावर कासव संवर्धनाचे मोठे काम सुरू आहे. यावर्षी नोव्हेंबरपासून 14 घरटी संरक्षित करण्यात आली असून त्यापैकी सहा घरट्यातून तब्बल 448 कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. सातव्या घरट्यातून नुकतीच आणखी 96 पिल्लांनी समुद्राकडे धाव घेतली. आणखी सात घरटी संरक्षित असून त्यातील पिल्लेही लवकरच समुद्राकडे धाव घेणार आहेत.

गावखडीतील संवर्धनाला बळ

त्यामुळे कासव संवर्धनाच्या मोहिमेला गावखडीतील कासव मित्र, वनविभाग आणि येथील ग्रामस्थांनी बळ दिले आहे. 
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील कासव संवर्धन केंद्राच्यावतीने ऑलिव्ह रिडले या कासवांच्या संवर्धनाचे काम केले जात आहे. 

आणखी सात घरटी संरक्षित
रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्था व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षे अस्तित्व नष्ट होत चाललेल्या ऑलिव्ह रिडले या कासव जातीचे संवर्धन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. येथील तरुण सदस्य प्रदीप डिंगणकर व राकेश पाटील यांनी कासव संवर्धनाचा ध्यास घेतला. समुद्रकिनारी गस्त घालण्याचे काम सुरू करून त्यांची घरटी शोधून त्यांच्या अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या.

तब्बल 544 कासवांची समुद्राकडे धाव

घरट्यामध्ये तयार झालेली पिल्ले समुद्रात सोडण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. नोव्हेंबरपासून तेथे असलेल्या 14 घरट्यांपैकी सहा घरट्यातून यापूर्वी 448 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. घरट्यातील पिल्ले सकाळच्या सत्रामध्ये समुद्रात सोडली जातात. सातव्या घरट्यातून 96 पिल्ले समुद्रात विसावली. अजून येथील किनार्‍यावर सात घरटी असून त्यातील पिल्लेही समुद्रात सोडली जाणार आहेत. 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राणिमात्रांचे अस्तित्व महत्वाचे असून ते नष्ट झाल्यास त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यात खारीचा वाटा म्हणून आम्ही कासव संवर्धनाचा ध्यास घेतला आहे.
---राकेश पाटील, कासव मित्र

,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT