कोकण

५६ हजार चाकरमान्यांमध्ये ३५ जण बाधित

गणेशोत्सव; चार मार्गांवरील नोंदणी पथके ठरली महत्त्वाची

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून १ लाख २३ हजार ५१२ चाकरमानी दाखल झाले. त्यातील कोरोना चाचण्यांचे अहवाल असलेल्यांची संख्या ५५ हजार ९८६ आहे. जिल्ह्यात आल्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये ३५ जणं कोरोना बाधित आढळले आहेत.

कोरोनातील परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्याचा फायदा गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्‍या चाकरमान्यांना झाला. जिल्हा प्रशासनाने लसीचे दोन डोस घेतलेले किंवा आरटीपीसीआर चाचणी केलेल्या चाकरमान्यांना प्रवेश देण्यात येईल, असे आदेश काढले.

त्यात सुधारणा करून चाचण्यांची अट शिथिल करतानाच चाकरमान्यांची जबाबदारी ग्राम कृतिदलाकडे सोपवण्यात आली. ८ सप्टेंबरपासून चाकरमान्यांची पावले कोकणाकडे वळू लागली. १० सप्टेंबरला सर्वाधिक चाकरमान्यांनी रेल्वे, एसटीसह खासगी वाहनांमधून प्रवेश केला. चाकरमान्यांची नोंद करून घेण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्‍या चार मार्गांवर नोंदणी पथके ठेवण्यात आली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात किती चाकरमानी आले, ते समजू शकले.

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात सुमारे १ लाख २३ हजार ५१२ चाकरमानी आले. जिल्ह्यात आल्यानंतर १३ हजार ६१२ जणांच्या चाचण्या झाल्या. त्यातील ३५ जण कोरोनाबाधित आढळले. त्यात लांजा व रत्नागिरीत प्रत्येकी २, चिपळूण ९, गुहागर १२ आणि दापोलीत १० जणांचा समावेश होता.

जिल्ह्यात चाकरमानी आले = १ लाख २३ हजार ५१२

  1. चाचणी करून आलेले - ४२ हजार ३७४

  2. आरटीपीसीआर - १२ हजार ९६४

  3. अ‍ॅण्टीजेन चाचण्या- २९ हजार ४१०

  4. जिल्ह्यात आल्यानंतर चाचण्या- १३ हजार ६१२

चाकरमान्यांची संख्याः

तालुका चाकरमानी

मंडणगड - ७, ८३०

दापोली -५, ६६४

खेड -१९, ०८१

गुहागर -१२, ६९२

चिपळूण -११, ०६९

संगमेश्‍वर -२५, १५६

रत्नागिरी -२०, ०३५

लांजा -१३, ५३३

राजापूर -८, ४५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT