police esakal
कोकण

कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या रत्नागिरीतील 6 अधिकाऱ्यांच्या बदल्या

- राजेश शेळके

गृह विभागाचे काल सायंकाळी उशिरा यासंदर्भातील आदेश प्राप्त झाले. त्यानुसार संबंधितांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेशात म्हटंले आहे.

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलातील (ratnagiri district) सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये २ पोलिस निरीक्षक व ४ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक अनिल लाड व चिपळूण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ या दोघांची रायगड येथे बदली झाली आहे. (konkan Update)

गृह विभागाचे काल सायंकाळी उशिरा यासंदर्भातील आदेश प्राप्त झाले. त्यानुसार संबंधितांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेशात म्हटंले आहे. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक म्हणून अनिल लाड यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला होता. जनतेशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे प्रत्येक सण समारंभात त्यांना मानाचे स्थान दिले जात होते. गुन्हे उघडकीस आणण्यातही त्यांचा हातखंडा होता. शहरातील अनेक गंभीर गुन्हे त्यांनी उघडकीस आणले.

आदोलने, मोर्चे चांगल्या पद्धतीन हाताळले. त्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांत त्यांच्याबद्दल आदर होता. चिपळूणचे निरीक्षक देवेंद्र पोळ यांचीही कामाची पद्धत चांगली असल्याने चिपळुणमध्ये त्यांनी जनतेसह कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध होते. जिल्ह्यातील या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

रत्नागिरी येथे पोलिस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेल्या ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस उपनिरीक्षक समस बेग, महेश धोंडे, विकास चव्हाण व अस्मिता पाटील या सर्व अधिकारऱ्यांची रायगड येथे बदली करण्यात आली आहे. या सर्व बदली झालेल्या अधिकाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यात आलेले पोलिस अधिकारी

जिल्ह्यात येणाऱ्या पोलिस निरीक्षकांमध्ये रवींद्र शिंदे, दादासाहेब घुटुकडे आणि सुजाता तानवडे यांची रायगड येथून रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक विनायक माने यांची पालघर येथून रत्नागिरी, हर्षद हिंगे यांची रायगड येथून रत्नागिरी तर गायत्री पाटील व शितल पाटील यांची सिंधुदुर्ग येथून रत्नागिरी येथे बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT