6 youth drawn in sea from dabhol ratnagiri 3 dead and 3 survived from villagers in ratnagiri 
कोकण

कोकणात एकाच वेळी तीन पर्यटकांवर काळाचा घाला आणि तिघांना जीवनदान

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रात आज सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेले 6 पर्यटक पाण्यात बुडाले होते. स्थानिक नागरिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले असून 3 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी औंध (पुणे) येथून एका कंपनीतील 15 तरुण मुले पर्यटनासाठी आंजर्ले येथे आले होते. त्यातील 6 जण पोहण्यासाठी आंजर्ले येथील समुद्रात गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. 

किनाऱ्यावर असलेल्या आंजर्ले येथील संचित सावंत या 12 वर्षाच्या मुलाने पाहिल्यावर त्याने भंडारवाडा येथे जाऊन तेथील युवकांना याची माहिती दिली. यावेळी स्थानिक युवकांनी समुद्राकडे धाव घेऊन बुडणाऱ्या या 6 जणांना पाण्याबाहेर काढले. मात्र अक्षय राखेलकर (वय 25), विकास श्रीवास्तव (वय 24), मनोज गावंडे (वय 24) यांचा मृत्यू झाला. रोहित पलांडे, उबेद खान, निहाल चव्हाण यांना वाचवण्याच आले. यांच्यावर आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.


आंजर्ले येथील अभिनय केळस्कर, अजिंक्य केळस्कर, अजित भाटकर, संदेश गुहागरकर, संदीप मयेकर, मयूर धोपावकर, स्वरूप महाडिक, जितेंद्र बेलकर, प्रथमेश तोडणकर, प्रवीण तोडणकर हे युवक या बचाव कार्यात सहभागी झाले होते. 
दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील घटनास्थळी रवाना झाले आणि ते अधिकचा तपास करत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT