650 cultivators 275 processors have GI in Ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत 650 बागायतदार, 275 प्रकियादारांकडे जीआय 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - नवीन हंगाम सुरू झाला तरीही कोकणातील आंबा बागायतदारांकडून जीआय मानांकनासाठी तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत 650 आंबा बागायतदार आणि 275 प्रकियादारांनी जीआय मानांकनासाठी नोंदणी केली आहे. हापूसच्या नावावर होणारी आंबा विक्री रोखण्यासाठी जीआय हा एकमेव पर्याय आहे. 

आंबा हे कोकणातील प्रमुख पीक आहे. बागायतदार जीआय नोंदणीसाठी पुढे येत नसल्यामुळे परराज्यातील आंबा विक्रेत्यांना घुसखोरीसाठी बाजारपेठ खुलीच राहणार आहे. जीआय नोंदणी करण्यासाठी कोकणात प्रत्येक जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोकणातील पाच जिल्ह्यातील आंब्याला हापूस जीआय मिळाले.

हापूसचा टॅग वापरायचा असल्यास संबधित आंबा उत्पादक, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार यांना विहित शुल्क भरून नोंदणी करणे आवश्‍यक आहे. नोंदणीसाठी हापूस नावाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. सध्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने जीआयची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. 

कोकणातील पाचही जिल्ह्यात मिळून 40 ते 50 हजार आंबा बागायतदार आहेत. आतापर्यंत जीआय नोंदणीसाठी प्रक्रियादार आणि बागायतदार मिळून सव्वानऊशे जणांची नोंदणी झाली आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नोंदणीचे काम पूर्णतः स्थगित झाले होते. यंदा या नोंदणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी काही दिवस आधी सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले होते. बेकायदेशीरपणे आंब्याला हापूस हे नाव वापरले गेले तर त्या विरुद्ध कठोर कारवाई करणे शक्‍य होणार आहे. 

या चार संस्थांकडे नोंदणी 
हापूस टॅग वापरण्यापूर्वी कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था, देवगड आंबा उत्पादक संघ, केणशी आंबा उत्पादक संघ यांच्यापैकी कोणाकडेही नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या चार संस्था आता भौगोलिक निर्देशनप्राप्त हापूसच्या मालक संस्था आहेत. 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT