7 people also entered in konkan from UK in ratnagiri 
कोकण

कोकणकरांच्या चिंतेत भर ; ‘युके’हून आणखी सात जणांची एंट्री

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : लंडनहून आलेल्या अनेकांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे काहीसा दिलासा मिळालेल्या आरोग्य यंत्रणेची पुन्हा चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आता ‘युके’हून आणखी ७ जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन परदेशातून आलेल्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

आरोग्य यंत्रणात यातून सावरत असताना जिल्ह्यात ‘युके’हून आणखी सातजण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली आहे. या यादीतील लोकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. यामध्ये चिपळूण, दापोली, देवरूख येथील नागरिक आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरटीपीसीआर ४, तर ॲन्टिजेनमध्ये ३ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्‍यात ३, दापोली १, चिपळूण २, लांज्यामधील १ चा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ९ हजार १५५ झाली आहे. दिवसभरात १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण ८ हजार ६४६ जण बरे झाले असून बरे होण्याचा टक्का घसरून ९४.४४ टक्के झाला आहे. एकूण ५९ हजार ६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात एकाचाही कोरोनाने मृत्यू झालेला नाही. मात्र मृत्यूदर ३.५७ वर स्थिर आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या कोविड सेंटरवर १५१ जण उपचार घेत आहेत. 

४ जणांचे अहवाल निगेटिव्ह 

नोकरी, व्यवसायानिमित्त लंडनमध्ये असलेले जिल्ह्यातील ९ जण रत्नागिरीत परतले होते. कोरोनाच्या बदलत्या प्रकारामुळे परदेशातून येणाऱ्यावर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना एमआयडीसीतल विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यांचे स्वॅब घेतले असता ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT