70 acres land saline soil in ratnagiri farmers face problem in ratnagiri 
कोकण

शेतकरी झाले हवालदिल ; कोकणात 70 एकर जमीन क्षारपड होण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यांमध्ये भरविण्यात येणाऱ्या जनता दरबारात ग्रामस्थांनी मांडण्यात आलेल्या समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे रत्नागिरी तालुक्‍यातील गावखडी येथे तुटलेल्या खारभूमी बंधाऱ्याची झडपे अजूनही बसवलेली नाहीत. जैसे थे परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना खाऱ्या पाण्याचा सामना करावा लागत असून येथील शेतजमिन नापीक होत आहे. 

सागरी मार्गावरील गावखडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीत खारे पाणी जाऊन ती नापिक झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार खारे पाणी रोखण्यासाठी खारभूमी विभागाने संरक्षक बंधारा बांधला होता. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पीक घेणे शक्‍य झाले होते. या बंधाऱ्याची झडपे तुटली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्राचे खारे पाणी शेतात घुसत आहे. या संदर्भात संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आमदार उदय सामंत यांच्याकडे ही समस्या मांडली. त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. परंतु दोन महिने उलटले तरी संबंधित खात्याने लोकप्रतिनिधींच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे. ही झडपे पुन्हा न बसवल्यास शेतजमिन पूर्ण क्षारपड होणार असून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. 

रब्बी हंगामात येथील जमिन ओसाडच 

येथील सुमारे 60 ते 70 शेतकरी भातशेती करतात. तसेच यापूर्वी रब्बी हंगामात कडधान्य, भाजीपाला पिकवत होते. मात्र, खाऱ्या पाण्यामुळे रब्बी हंगामात येथील जमिन ओसाडच असते. सुमारे 70 एकर जमिनीला खारे पाणी लागल्याने मोठे नुकसान होत आहे. 

यासंदर्भात गावातील पाच समस्यांबाबत जनता दरबारात विषय मांडण्यात आले. त्यात या विषयाचा समावेश आहे. परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नाही. 
- अनिल फडके, ग्रामस्थ 


दृष्टिक्षेप

  • खाऱ्या पाण्यामुळे पिकासह जमिनीचे होतेय नुकसान 
  • त्या परिसरातील विहिरींचे पाणीही झाले खारे 
  • येथील शेतकऱ्यांचे पिण्याचे पाण्याचेही होताहेत हाल  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT