78 wedding moments this year 
कोकण

शुभ- मंगल सावधानसाठी यंदा 78 मुहूर्त 

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असले तरी आता दैनंदिन व्यवहार भीतीच्या सावटाखाली सुरू आहेत. धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी थेटपणे उठलेली नाही; मात्र आठ महिन्यांपासून रखडलेले विवाह सोहळे मात्र उरकले जाणार आहेत. यंदा 11 नोव्हेंबरला तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्याला सुरवात होणार आहे. या वर्षात तब्बल 78 मुहूर्त असल्याने विवाहासाठी वधू-वरांच्या पालकांना जवळचा मुहूर्त शोधणे सोयीचे होणार आहे. 

सार्वजनिक स्थळांवरील कार्यक्रमांना गेल्या मार्च महिन्यापासून बंदी होती. आता काही प्रमाणात शिथिलता आली आहे; पण असे धार्मिक कार्यक्रम कोरोना प्रार्दुभाव वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अजून काहीकाळ कोरोनाचे संकट आहे. जोवर लस उपलब्ध होत नाही. तोवर धोका ठळला, असे म्हणता येणार नाही. राज्यात अजूनही मंदिरांची दारे उघडलेली नाहीत. धार्मिक पर्यटन असो वा इतर पर्यटनस्थळे असो, अजूनही सरकारने मुबा दिली नाही.

शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे संसाराचा गाढा अजूनही रूळावर आलेला नाही; पण आपल्या मुलांचे योग्य वयात विवाह उरकावेत, हे आई- वडीलांचे कर्तव्य असते. त्यामुळे सहा महिन्यांत पुढे ढकललेले विवाह सोहळे सुरू होतील. कोकणात पारंपरिक पद्धती आणि रूढीनुसार साधारण तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होते. 
यंदा 78 मुहूर्त असल्याने अनेक जण आतापासून मंगल कार्यालय, कॅटर्स, डेकोरेशन बुकिंग करत आहेत. 

यंदाचे लग्नाचे मुहूर्त असे 
नोव्हेंबर : 16, 21, 23, 25, 26. डिसेंबर ः 2, 3, 4, 5, 6, 8, 14, 18, 19, 20, 24, जानेवारी ः 17, 18 , 19, 20, 23, 24, 29. फेब्रुवारी ः 2, 3, 5, 6, 11, 13, 14, 16, 17, 19, 21, 28. मार्च ः 1, 2, 5, 6, 10, 11, 14, 15, 16, 18, एप्रिल ः 17, 19, 20, 21. मे ः 4, 7, 8, 9, 14, 16, 17, 19, 21, 22, 23, 27,31. जून ः 2, 3, 5, 6, 8, 10, 12, 15, 17, 18, 19, 20, 28. जुलै ः 1, 2, 3. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT