881 children on the verge of malnutrition in Sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात 881 मुले कुपोषणाच्या उंबरठ्यावर

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यातील एकूण सर्वेक्षण 0 ते 6 वयोगटातील 40 हजार 183 बालकांमध्ये 748 एवढी बालके कमी वजनाची तर 73 बालके तीव्र कमी वजनाची आहेत. यामुळे 881 मुले कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. प्रशासन त्यांना सर्वसामान्य श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागामार्फत कुपोषण मुक्तीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास सभापती माधुरी बांदेकर यांनी दिली. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत ऑक्‍टोबर अखेर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण 40 हजार 183 बालकांपैकी 40 हजार 042 बालकांचे वय आणि उंचीनुसार वजन करण्यात आले. यामध्ये एकूण 40 हजार 221 एवढी बालके सर्व साधारण श्रेणीत असून कमी वजनाची 748 व तीव्र कमी वजनाची 73 एवढी बालके आहेत. 

जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्ह्यातील कमी वजनाची व तीव्र कमी वजनाच्या बालकांमध्ये सुधारणा व्हावी. त्यांचे वजन वाढून ती सर्व साधारण श्रेणीत यावीत. यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करून कमी वजनाच्या मुलांची विशेष काळजी घेतली जात आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्‌यानुसार मुलांचे वजन वाढविण्यासाठी एनर्जी डेन्स न्यूट्रिशियस फूड हे पोस्टीक खाद्य दिले जात आहे.

या पौष्टिक खाद्यामुळे मुलांच्या वजनात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कमी वजनाच्या 748 बालकांपैकी 106 मुलांमध्ये व तीव्र कमी वजनाच्या 73 बालकांपैकी 17 मुलांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. कमी वजनाची बालके जन्माला येण्याची विविध कारणे आहेत. वय आणि उंचीवरून केलेल्या सर्वेक्षणात काही मुले कमी वजनाची वाटत असली तरी ती निरोगी व चपळ असल्याचे दिसून येते. तरी पालकांनी आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. 


अंगणवाडी केंद्रामार्फत सर्व मुलांना नियमित पोषण आहार दिला जातो. पालकांनीही मुलांची काळजी घ्यावी. त्यासाठी ग्राम बालविकास केंद्रांमध्ये पालकांना मार्गदर्शन केले जाते. त्याचा लाभ घेऊन सल्ल्यानुसार पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी. 
- माधुरी बांदेकर, सभापती, महिला व बालविकास, जिल्हा परिषद. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT