The 9 women gave a helping hand out of household expenses 
कोकण

त्या 9 महिला बनल्या या कुटुंबांचा आधार....

सकाऴ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : खेड तालुक्यातील धामणी गावातील विधवा महिला व निराधार कुटुंबे लॉकडाऊनच्या काळात उपासमारीचा सामना करत होते. जवळपास 9 कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढावले असल्याची माहिती खेड येथील मनिवाईज सेंटर अर्थात आर्थिक साक्षरता करणाऱ्या कार्यालयाला मिळाली. या कार्यालयाच्या प्रमुख रोहिणी अवघडे यांनी खेड काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष दानिषता नाडकर यांना याबाबत माहिती दिली व या निराधार कुटुंबांना मदत करण्यासाठी विनंती केली.

त्यानुसार दानिषता नाडकर यांनी मुस्लिम समाजातील काही महिलांना याबाबत माहिती दिली व प्रत्येकीने आपल्या घरखर्चातून बचत केलेल्या रक्कमेतून तब्बल 9 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. शनिवारी सकाळी धामणी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक आंबडसकर यांच्या उपस्थितीत दानिषता नाडकर व त्यांच्या सहकारी मुस्लिम भगिनींनी 9 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. यावेळी पत्रकार जितेश कोळी, राहुल प्रभू हे उपस्थित होते.

खेड मधील मुस्लिम महिलांनी राबवलेला हा उपक्रम आजच्या लॉकडाऊनच्या काळात सर्वाना प्रोत्साहन देणारा ठरत आहे. बचतीच्या पैशांमधून गोरगरिबांना मदत करून या महिलांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यास्मिन पोत्रिक, मालिका नाडकर या महिलांसह मुस्लिम समाजातील अनेक महिलांनी दानिषता नाडकर यांच्या उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT