92 years old lady corona against fight in sangameshwar in ratnagiri 
कोकण

आईच्या आत्मविश्वासाला मुलांनी दिले बळ ; ९२ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्‍वर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील अंत्रवली गावच्या राबिया हुसैन नेवरेकर या ९२ वर्षांच्या आजीने कोरोनाची लढाई जिंकत कोरोनावर स्वतः मात केली आहे. राबिया हुसैन नेवरेकर मूळच्या संगमेश्वर तालुक्‍यातील आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध उद्योजक सिराज नेवरेकर यांच्या त्या आई. कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. यातून कौटुंबिक लढायाही झाल्या.

स्वतःच्या घरातील कोरोना बाधिताजवळ जायलाही कोणी तयार नव्हते. अशा स्थितीत सिराजभाई नेवरेकर व त्यांच्या भावंडांनी कोरोनाच्या लढाईत आईची साथ सोडली नाही. आईचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्व मुलांनी आईला बळ दिले. आईला हॉस्पिटलमध्ये कंटाळा येऊ नये म्हणून गाणी व इतर उपाय राबवून त्या एकट्या असल्याचा भास त्यांना होऊ दिला नाही. ६ डिसेंबरला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात डॉ. सुशील मुळ्ये यांनी मोठे परिश्रम घेऊन उपचार केले.

डॉ. मुळ्येंनी योग्यवेळी योग्य उपचार केल्याने आजीने कोरोनावर मात केली. आजी ९२ व्या वर्षातही ठणठणीत आहेत. अतिशय गरीब परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या मुलांना मोठे केले. त्यांना संस्कार दिले. आज तीच मुलं स्वतःच्या पायावर उभे राहून सामाजिक कार्याबरोबर स्वतःचाही उद्योग करत आहेत. या वयात आपल्या मुलांच्या जोरावर आत्मविश्वासाने ही कोरोनाची लढाई जिंकल्याचे मत आजीने व्यक्त केले. या आजीने ९२व्या वर्षी कोरोनावर मात करून यातून वयोवृद्धही बरे होऊ शकतात, असा संदेश दिला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT