937 mm of rain in three centers in three days in mandangad then farming started
937 mm of rain in three centers in three days in mandangad then farming started 
कोकण

पावसाच्या कोसळधारेने बळीराजा चिखळणीत ; गप्पा व लावणीची रंगत लागली रंगू....

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : डोक्यावर पावसाची कोसळधार..तुडुंब भरलेली खलाटी...नांगरणी झाल्याने तयार झालेल्या चिखलात रांगेत भाताची सुरू असलेली लावणी. हे डोळ्यांना सुखावणारे चित्र तालुक्यातील अनेक खलाटी शेतातून दिसून येत आहे. तालुक्यात पावसाची कोसळधार सुरू असून तुडुंब भरलेल्या शेतात सर्जा राजांचे नांगर फिरवत तर काही शेतात पावर ट्रीलर फिरवत बळीराजा चिखळणीत गुंतला आहे. तर महिला चिखळणीत भात लावताना गप्पा व लावणीची पारंपरिक गाणी गुणगुणत आहेत.


 तालुक्यात सरासरी ३५०० मिमी पाऊस पडतो. मे महिन्यात रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करण्यात आली. मात्र पावसाने ३ जून नंतर शेवटच्या आठवड्यात आपली हजेरी लावली. काहीसा चिंतेत असणारा शेतकरी पावसाच्या आगमनाने सुखावला. संततधारेच्या पावसात रोपांची वाढ झाल्याने तो लावणीच्या कामांकडे वळला आहे. पावसाने तीन दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे बळीराजा दिवसभर शेतात राबत असून लावणीची कामे आटोपण्याकडे लक्ष ठेवून आहे. तालुक्यात ८ जुलै सकाळपर्यंत एकूण ११५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी ११३० मिमी पाऊस झाला होता. नदी, नाले, ओढे यांचा प्रवाह गतिशील झाला आहे. निवळी, भारजा नद्यांचे पात्र भरून प्रचंड वेगाने समुद्राकडे वाहत आहे. पाणथळ शेतात छोटे झरे जिवंत झाले आहेत. शेताच्या बांधातील बिळातून खेकडी डोकावताना दिसतात.

जास्त पाण्याचा चिखळणीला अडथळा
 शेतात वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा चिखळणी करताना अडथळा होत आहे. जमीन नांगरताना फाळ लावलेले तास दिसून येत नसल्याने काही ठिकाणी माती कडक राहते. त्यामुळे भाताची रोपे लावताना हाताला इजा होते.

तीन दिवसांत तीन केंद्रात ९३७ मिमी पाऊस


तारीख  मंडणगड  म्हाप्रळ  देव्हारे  एकूण 


५ जुलै       २५३     १५०      २८०    ६८३    
६ जुलै       ३९       १६         १०       ७५
७ जुलै       ४०        ५८        ३४       १३२
८ जुलै       ४३       ५२         ५२       १४७


भातलावणी योग्य पाऊस पडत आहे. मोठ्या खलाट्यातून एकमेकांच्या मदतीने शेतकऱ्यांकडून लावणी केली जात आहे. शेतात आधुनिक औजारांचा वापर वाढला आहे. असाच पाऊस कायम राहिला तर लावणी लवकरच आटोपता येईल. - तुकाराम कीजबिले, शेतकरी.

संपादन - अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT