राजापूर (रत्नागिरी) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योगव्यवसाय ठप्प झाले आहेत. त्याचा फटका व्यवसायिकांसह कामगारांनाही मोठ्याप्रमाणात बसला आहे. हाताला काम नसल्याने अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये बांधकामे करण्यासाठी शासनाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे कामगारांसह व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. कामे सुरू झाल्याने कामगारांमध्ये आनंदी आनंद असला तरी मात्र, व्यवसायिकांचा आनंद काहीसा औटघटकेचा ठरला आहे.
लॉकडाऊमुळे उद्योग व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक चक्र ठप्प झाले आहे. अशा स्थितीमध्ये अर्थचक्र पुन्हा गतीमान होताना रोजगार निर्मिती होण्याच्यादृष्टीने शासनाने काही कामांना सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, बांधकामांसाठी लागणार्या साहित्याच्या दरामध्ये सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाल्याने ठेकेदारांचे पुरते कंबरडे मोडून गेले आहे. वाढत्या दरांमुळे आर्थिक नियोजनाची घडी विस्कळीत झाली आहे. ‘चार पैशांचा फायदा मिळविण्यापेक्षा केवळ वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचा दिलेला शब्द पाळण्यासाठी’ अनेक ठेकेदारांनी कामे सुरू करून ती पूर्ण करण्याला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक दुकानांमध्ये बांधकाम साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातच, कंपन्यांकडून बांधकाम साहित्य स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हायला काही कालावधी जाणार आहे. अशा स्थितीमध्ये सिमेंट, पत्रा, स्टील, चिरे आदी बांधकाम साहित्याच्या दरामध्ये सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठेकेदारांनी बांधकामाचे ठेके लॉकडाऊनच्या पूर्वीच्या दराप्रमाणे त्याकाळात घेतलेले आहेत. त्याचे अंदाजपत्रकही सध्याच्या तुलनेत कमी आहे. मात्र, बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे लॉकडाऊननंतर बांधकामाचे बजेट कोलमडून ठेकेदारांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या दरांमुळे बांधकामाच्या बजेटमध्ये होणारी वाढ आणि त्यातून, ठेक्याच्या रक्कमेच्या संभाव्य नफ्यामध्ये होणारी घट नेमकी कुठून आणि कशी भरून काढायची ? असा प्रश्न ठेकेदारांसमोर उभा ठाकला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.