संस्थेच्या वादात शैक्षणिक नुकसान; पालक आक्रमक 
कोकण

मंडणगड : संस्थेच्या वादात शैक्षणिक नुकसान; पालक आक्रमक

शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुलला लावले टाळे

सचिन माळी.

मंडणगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शैक्षणिक क्षेत्र कार्यरत करण्यात आले. त्यात आता एसटी आंदोलन सुरू असून विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहत असताना आता संस्थेच्या अंतर्गत वादामुळे मंडणगड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय या नामवंत शाळेला टाळे लावण्याचा प्रकार ता.१८ नोव्हेंबर रोजी घडला. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी संस्था संचालकांना जाब विचारत शाळा सूरू केली. यासंदर्भात संतप्त झालेल्या पालकांनी संस्था संचालक यांना घेरावा घालत जाब विचारला व मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये असे सांगीेतले.

यावेळी पालकांनी संस्थेचा वाद मिटत नाही तोपर्यंत प्रशासक म्हणून शिक्षणाधिकारी यांचेकडे शाळेचा कारभार देवून शैक्षणिक नुकसान टाळावे, अन्यथा पालक संस्था संचालकांना सोडणार नाही असा इशाराही दिला. यासंदर्भात ता.२७ नोहेंबर २०२१ रोजी संस्था संचालक आणि पालक यांच्यात बैठक होऊन चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ता.१८ नोव्हेंबर रोजी शाळेत घडलेल्या प्रसंगावेळी शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी अध्ययनासाठी आलेले असताना वर्गखोल्या व शाळा कार्यालयाला कुलुप असल्याचे पाहीले. हे कुलुप कोणी लावले व कशासाठी याबाबत उलगडा झाला नाही. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी हे वर्गखोली बाहेर होते.

एकीकडे एस.टी. आंदोलन सुरू असताना पालक विद्यार्थी विविध कसरती करून शाळेत पाठवत आहेत. त्यासाठी त्यांना आर्थीक भूर्दंड पडत आहे. असे असताना संस्थेच्या दोन मंडळातील अंतर्गत वादामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बुधवारी शाळेच्या कार्यालयाला अज्ञाताने टाळे ठोकले होते. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी व संस्थेतील एक गट पोलीस्थानकात दिवसभर ठाण मांडून होते. त्यामुळे बुधवारी त्याचा परीणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर झाला होता.

असे असतानाच आज संपूर्ण शाळेतील वर्ग खोल्यांना टाळे ठोकल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी बाहेरच ताटकळत राहिले. ही बातमी समजताच शहरातील पालक वर्गाने शाळेत धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. यांत दोन संस्थांच्या वादात विद्यार्थी व शिक्षक पिडले जात असल्याचे पाहून पालक आक्रमक झाले. त्यांनी सरळ उपस्थित संस्था चालक यांनाच फैलावर घेत जाब विचारला. तसेच कुलूप उघडून शाळा सुरू करा अन्यथा शाळेच्या कारभाराबाबत पालक म्हणून योग्य निर्णय करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांनी पालकांच्या वतीने दिल्यानंतर वर्ग उघडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT