accident of bus in kashedi ghat ratnagiri for many people injured 
कोकण

ब्रेकिंग ; प्रवाशांनी भरलेली बस ५० फूट दरीत कोसळली

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रायगड हद्दीत (भोगाव) येथे बस ५० फुट दरीत कोसळली. ही बस मुंबई सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस आहे. आज पहाटे चार वाजता कशेडी घाटात ही घटना घडली. 

बसमध्ये २७ प्रवासी होते. त्यापैकी २५ जणांना बाहेर काढले आहे. 
या अपघातात जखमींसाठी मदतकार्य सुरू आहे. बहुतेक प्रवासी संगमेश्वर येथील आहेत. यामध्ये सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एक वृद्ध व्यक्ती अजूनही गाडीत अडकून आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी मदतीला दाखल झाल्या आहेत. २५ जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अशी माहिती अपघातस्थळारुन प्राप्त झाली आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT