accident case in sindhudurg 
कोकण

त्या ट्रक चालकाची मृत्यूशी झुंज दोन ते अडीच तास अन्...

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : मुंबई गोवा महामार्गावर तेरसेबांबार्डे येथील शेणई यांच्या बंद घरात ट्रक घुसुन झालेल्या भीषण अपघातात दोन ते अडीच तास मृत्यूशी झुंज देणारे ट्रक चालक हिरालाल घनश्याम सिंह (रा दिल्ली आग्रा वय ५०) हे ठार झाले तर मुलगा व्यवस्थित आहे हा अपघात काल रात्री 11 च्या दरम्यान झाला.


 मुंबई-गोवा महामार्गावर काल शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास मयत श्री सिंह हे आपल्या ताब्यातील मालवाहक ट्रकमधून  लोखंडी चॅनलची  वाहतुक करीत  गोव्याच्या दिशेने जात होते त्याच्यासोबत त्याचा मुलगा होता .तेरसेबाबर्डे येथे आला असता या ठिकाणी श्री शेणई यांचे बंद घर आहे रस्ता चौपदरीकरणामुळे हे घर बंद आहे ट्रकचालकाला अंदाज न आल्याने हा ट्रक  शेणई यांच्या बंद घरात घुसुन भीषण अपघात झाला. सदर अपघातात ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला असुन ट्रक चालक हिरालाल घनश्याम सिंह (वय ५०) हे ठार झाले तर त्यांच्यासोबत क्लीनर मुलगा अमृत हिरालाल सिंह हा व्यवस्थित आहे मुलाच्या समोरच बाप ठार झाल्याने मुलग्यावर फार मोठे संकट ओढवले.  कुडाळ पोलिसानी घटनास्थळी जाऊन  पंचनामा केला .

त्यांची अडीच तास मृत्यूशी झुंज
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली अडीच तास मृत्यूशी झुंज
 अपघाताबाबत तेरसेबांबार्डे बिबवणे गावातील ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या श्री सिंह यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला श्री सिंह यांच्या पोटात स्ट्रेअरींग घुसले होते लोखंडी सळई पाठीवर पडल्या होत्या अशावेळी दिलीप बिल्डकाँनचा बुलडोझर मागविण्यात आला त्यातून करण्यात आलेले  प्रयत्न निष्पळ ठरले त्यानंतर लगेचच क्रेन मागविण्यात आली मध्यरात्री अडीच च्या दरम्यान श्री सिंह यांना बाहेर काढण्यात यश आले त्यांना रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले तब्बल अडीच तासानंतर त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी पोलिसांसह भाजप युवा अध्यक्ष रुपेश कानडे दादा चव्हाण जिजबा सावंत मळावाडीतील ग्रामस्थ दिलीप बिल्डकाँनच्या कामगारांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Video

Yami Gautam and Emraan Hashmi: यामी गौतम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, ‘हक’मधून समाजाविरुद्ध लढणाऱ्या आईची कथा

Pune Crime : फळ विक्रेत्यासह दोघांवर हडपसरमध्ये शस्त्राने वार, एकाला अटक; साथीदारांविरुद्ध गुन्हा

Sanjay Shirsat : निवडणुकीपूर्वीच महापौरपदाचे बाशिंग! पालकमंत्री शिरसाट यांच्या पुत्राला शुभेच्छा देणारे शहरात झळकले होर्डिंग्ज

SCROLL FOR NEXT