accident of four wheeler and ST one teacher dead in accident in sakharpa ratnagiri 
कोकण

एसटी आणि चारचाकीच्या भीषण अपघातात शिक्षक जागीच ठार

अमित पंडीत

साखरपा (रत्नागिरी) : नजीकच्या देवडे नंबर २ शाळेतील शिक्षक संदीप कांबळे यांचे रविवारी अपघाती निधन झाले. एसटी आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत कांबळे ठार झाले. त्यांच्या अपघाती निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

रविवारी सायंकाळी संदीप कांबळे हे आपली कार (क्र एम एच ०८ सी ६९३६) घेऊन देवरुखकडे जात असताना मोर्डे खिंडीनजीक समोरून आलेल्या देवरुख साखरपा या एसटीला (क्र एम एच ०९ एफ एल १०८३) त्यांच्या कारची जोरदार धडक झाली. या अपघातात कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रत्नागिरीतील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

संदीप कांबळे हे मूळचे शाहूवाडी येथील होते. साखरपा परिसरात त्यांची शिक्षकी कारकीर्द घडली. क्रीडा अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. २०१४ साली त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. जिल्हा कबड्डी असोसीएशनचे राज्यस्तरीय पंच म्हणून त्यांनी काम पाहिले होते. कांबळे हे उत्तम व्होलिबॉलपटू असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या अकाली अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

SCROLL FOR NEXT