accident in konkan dapoli one person dead in accident 
कोकण

भरधाव डंपरने दुचाकीला दिली धडक ; अपघातात एकजण जागीच ठार

चंद्रशेखर जोशी

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील गावतळे दापोली मार्गावर शिवाजीनगर (साखळोली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ बुधवारी (ता. 17) सायंकाळी 7 वाजता डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश शिंदे हे डंपर (एमएच-04-एफजे-3287) हा कर्जी ते जालगाव दरम्यान डंपर घेऊन येत असताना गावतळे शिवाजीनगर अंतर्गत रस्त्यावर डंपरच्या पुढे जात असलेल्या दुचाकीला (एमएच-08-यू-2091) डंपरने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार व सहप्रवासी दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्यांच्यावरून डंपर गेल्याने नीतेश जाधव (वय 30, रा. जालगाव) हे ठार झाले. जितेंद्र काशिनाथ चव्हाण (35, रा. जालगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लाईफकेअर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी झालेले जितेंद्र चव्हाण यांच्याच मालकीचा हा डंपर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अपघाताची नोंद दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून डंपर चालक आकाश शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत. 

बेकायदा वाळू वाहतूक उघडकीस

खेड तालुक्‍यातील कर्जी येथून दापोली येथे दिवसरात्र बेकायदा वाळू वाहतूक केली जात असून डंपरचालक वेगाने डंपर चालवून जास्तीत जास्त वाळूच्या ट्रीपा कशा मारता येतील, हे पहात असतात. या अपघातामुळे बेकायदा वाळू वाहतूक उजेडात आली असून आता तरी महसूल विभाग व पोलिस अधिकारी या बेकायदा वाळू वाहतुकीवर कारवाई करतील का? असा सवाल दापोलीकरांकडून विचारला जात आहे. अपघातावेळी या डंपरमध्ये वाळू होती; मात्र अपघातानंतर वाळू कारवाई होऊ नये यासाठी जवळच्या एका घराच्या आवारात उतरवून ठेवण्यात आली व डंपर रिकामा असल्याचे दाखविण्यात आल्याची चर्चा गावतळे परिसरात सुरू आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT