accident of man in kankavli sindhudurg and he dead in sindhudurg 
कोकण

पर्यायी रस्त्यावरील लोखंडी पत्र्याला धडकून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : मित्राला भेटून घरी परतत असताना मोटारसायकल महामार्गावरील चौपदरीकरणाच्या पर्यायी रस्त्यावरील लोखंडी पत्र्याला धडकून कलमठ येथील तरुणाचा मृत्यू झाला. बाबाजी ऊर्फ बाळा नांदगावकर (वय २७, रा. कलमठ कुंभारवाडी) असे त्याचे नाव आहे. अपघात मंगळवारी (२२) रात्री उशिरा जानवली-बौद्धवाडी येथे महामार्गावर झाला.

अपघातानंतर त्याला उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सीटीस्कॅनही करण्यात आले; मात्र त्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांत उशिरापर्यंत अपघाताची नोंद दाखल झाली नव्हती. बाबाजी हा जानवलीहून कलमठकडे आपल्या घरी येत होता.

महामार्गावर बौद्धवाडी येथे ओढ्यालगत लावलेल्या पत्र्याला त्याच्या दुचाकीची धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की, यात बाबाजी तेथील ओहोळात फेकला गेला. रात्रीची वेळ असल्याने त्याला अंदाज आला नाही. गेल्या आठवड्यात ही असा एक अपघात त्याच ठिकाणी झाला आहे. अशा अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मागील कित्येक दिवस जानवली बौद्धवाडी येथे महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गाने वळविण्यात आली आहे.

महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी या अपघात स्थळाकडे दुर्लक्ष करित आहे. बाबाजी हा दुचाकी मेकॅनिक होता. अलीकडे तो रंगकाम करत असे. त्याच्याकडे सध्या काही ग्रामपंचायतींची फलक रंगवण्याची कामे आहेत. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळतात भाजपचे युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, गुरुनाथ वर्देकर, सुरेश वर्देकर यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली; मात्र बाबाजीला वाचवता आले नाही.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Viral Video : “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” म्हणताच प्राध्यापक भडकले; विद्यार्थ्याची स्टेजवरच धरली गचांडी, VIDEO VIRAL

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT