accident in mumbai goa highway one dead and two injured in khed 
कोकण

मुंबई - गोवा हायवेवर झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी वाहतूक पोलिस टॅपजवळील एसटी - दुचाकीच्या धडकेत स्वार जागीच ठार झाला. दुचाकीवरील अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (२३) रात्री झाला. कशेडी टॅपचे पोलिस बोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुहागर एसटी आगाराचे चालक दत्ताराम बाळकृष्ण महाडीक (४५) हे गुहागर ते मुंबई एसटी बस (एमएच - २० - बीएल - १५७४) घेऊन निघाले होते. कशेडी वाहतूक पोलिस टॅपजवळील अनुसया हॉटेलसमोर मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महाड ते खेडकडे जाणारी मोटारसायकलने (एमएच - ०८ - एयू - १७७९) एसटीला समोरासमोर धडक दिली. दुचाकीवर तिघेजण होते. 

अपघातात दुचाकीचालक विजय प्रकाश जाधव (२१, रा. उतेकरवाडी, चोरवणे, ता. खेड) हा जागीच ठार झाला. त्याच्यासोबतचे रोहित रंगराव जाधव (२०, भरणानाका, खेड) आणि तुषार दीपक जाधव (२१, रा. उतेकरवाडी, चोरवणे, खेड) हे जखमी झाले. या वेळी महामार्ग मृत्यूंजय दूत मुकुंद मोरे, महेश रांगडे व सहदेव कदम यांनी जखमी तसेच मृताला नरेंद्र महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या ॲम्ब्युलन्सने तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT