accident on mumbai goa highway one old lady dead in ratnagiri 
कोकण

मुंबई-गोवा हायवेवर झालेल्या अपघातात वृद्ध महिला जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणीनजीक मोटार रस्त्याशेजारील रेलिंगवर आदळून झालेल्या अपघातात वृद्ध महिला ठार झाली, तर अन्य चार जण जखमी झाले. हा अपघात सकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. वाहतूक पोलिस शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-वरळी-कोळीवाडा येथे राहणारे राघू गणपत पेडणेकर हे मोटार घेऊन मुंबईहून सावर्डेला यायला निघाले होते.

सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याची मोटार कळंबणीनजीक आली असता, चालक पेडणेकर यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला बसवलेल्या लोखंडी रेलिंगवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, लोखंडी रेलिंग तुटून मोटारीत घुसली. या अपघातात कारमधील प्रफुल्ल राजाराम मोरे (वय ४८), रोहित सुरेश वडवरकर (३८), प्रकाश जयराम सावंत (६९), परिचय प्रकाश सावंत (३२, सर्व रा. मुंबई) हे जखमी झाले, तर योनीबाई कृष्णा सावंत (८०) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

तत्काळ रुग्णालयात केले दाखल 

अपघाताची खबर मिळताच वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मदत ग्रुपचे प्रसाद गांधी आणि त्यांचे सहकारीही घटनास्थळी पोचले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान योनीबाई सावंत यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT