कोकण

मुलाला भेटून येताना बापावर काळाचा घाला; वेत्ये तिठ्ठ्यावरील घटना

आजगावमधील दुचाकीस्वार मोटारीच्या धडकेत ठार

सकाळ डिजिटल टीम

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गाच्या (gao-mumbai highway) झाराप-पत्रादेवी बायपासवर वेत्ये तिठा येथे दुचाकीला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला. (accident) ही घटना आज दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली. गुरुनाथ राजाराम प्रभूझाटये (वय ८५, रा. आजगांव, ता. सावंतवाडी ) असे मृताचे नाव आहे. इन्सुलीत मुलाला भेटून परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघातातील मोटार चालक विजयसिंग रामसुमेर सिंग यांनी येथील पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून मोटार व दुचाकी ताब्यात घेतली.

अधिक माहिती अशी, की मृत गुरुनाथ प्रभूझाटये हे इलेक्ट्रिक स्कूटरने आज सकाळी आजगावहून इन्सुली येथे राहणाऱ्या आपल्या मुलाच्या घरी गेले होते. तेथून ते वेत्येमार्गे आजगावला जाण्यास निघाले. वेत्ये तिठा येथे ते आले. तेथे एक दुसरी मोटार उभी होती. या उभ्या असलेल्या मोटारीमुळे त्यांनी दुचाकी महामार्गावर पुढे आणली. यावेळी झाराप पत्रादेवी बायपासवरून सुसाट येणाऱ्या इनोव्हाची (जीए ०७ इ १०१६) धडक त्यांच्या दुचाकीला बसली. यात ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. माजी सभापती राजू परब यांच्यासह माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भाई भोसले, वेत्येचे माजी सरपंच नरेंद्र मिठबावकर, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, वेत्येचे माजी पंच सदस्य बाळू गावडे, भाजपचे बांदा उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे, विजय गावडे, प्रसाद नाईक आदी घटनास्थळी पोचले.

सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. बी. साळुंके, पोलिसनाईक धनंजय नाईक आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुनाथ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. आजगावचे माजी सरपंच अण्णा प्रभू झाटये यांचे ते चुलत काका होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT