accident of one auto rickshaw in guhagar monkey also died in accident 
कोकण

अन् वानराला गमवावा लागला जीव, वाचवणाऱ्या रिक्षालाही झाला अपघात

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : रस्त्यावर अचानक आलेल्या वानराचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात एका रिक्षाला अपघात झाला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले तर धडकेमुळे वानराचाही जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना वेळंब गावातील मळण फाटा येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. जखमी प्रवाशांपैकी दोनजणांना अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.

ॲपे रिक्षा (एमएच-०८-ई-७५४३) वेळंबकडून शृंगारतळीकडे येत होती. ही रिक्षा नालेवाडी मळण फाटा येथे आली असता, जंगलातून अचानक वानराने रस्त्यावर उडी मारली. समोर वानर दिसल्यावर ॲपे रिक्षा चालकाने वानराला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र वानर रिक्षावरच आदळले. यामध्ये रिक्षा उलटली. रिक्षातील प्रवासी बाहेर फेकले गेले. तसेच रिक्षावर आदळलेला वानरही गतप्राण होऊन तेथेच कोसळला.

अपघात मासूमधील सामाजिक कार्यकर्ते आनंद भोजने यांनी पाहिला. त्यांनी रिक्षामधील तिघांना आपल्या वाहनातून चिखली आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघाताचे वृत्त कळतात रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मयु कोळवणकर, रूपेश भोसले, अनंत चव्हाण, दीपक रहाटे यांसह अनेक रिक्षाचालक चिखली आरोग्य केंद्रात मदतीस धावून आले. अपघाताचा पंचनामा गुहागर पोलिस ठाण्यातील बीट अंमलदार कादवडकर यांनी केला. या वेळी पाटपन्हाळे गावचे पोलिस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, सुनील राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

एकाला घरी पाठवले

वेळंबमध्ये राहणारे रत्नू भागोजी खांडे (वय ५०) यांना गंभीर इजा झाल्याने अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. श्वेता सुनील पिंपळे (वय ३७) यांना कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. वैष्णवी देवजी घाडे (वय ३५) यांना किरकोळ दुखापत झाली होती. चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. शशिकला वाडकर यांनी प्राथमिक उपचारांनंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Satara fraud:'बहुलेतील एकाची १३ लाखांची फसवणूक'; बनावट कागदपत्रांद्वारे माेटारीची विक्री, सहा जणांवर गुन्हा

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...

SCROLL FOR NEXT