accident of private bus in pavas 7 people injured in ratnagiri 
कोकण

पुलावरून चढ चढताना गाडी अचानक रस्त्यावर उलटली अन्..

सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) :  विजयदुर्गहून मुंबईकडे निघालेल्या साई तन्मय या खासगी प्रवासी बसला बुधवारी (ता. २०) सायंकाळी पावस-गोळप पुलावर अपघात झाला. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी सर्वजण मुंबईतील असल्याचे समजते.

साई तन्मय ही खासगी प्रवासी बस (MH-०४-HS-५४९५) बुधवारी विजयदुर्ग येथून पावसमार्गे मुंबईकडे निघाली होती. या गाडीत ३६ प्रवासी होते. ही गाडी गोळप पुलावरून चढ चढत असताना गोळप घाटीत अचानक मागे आली. चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. मागे मागे येत ती रस्त्यावर उलटली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी घाबरले. गाडी उलटल्याचा आवाज आल्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. 

या घटनेत बसमधील सात जणांना दुखापत झाली, पैकी एकाच्या डोक्‍याला गंभीर मार लागला. उर्वरित सहा जणांना किरकोळ इजा झाली. त्या सगळ्यांना उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. ही घटना कळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी गर्दी केली. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश गावित व देऊसकर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्‍यात आणली. अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT