accident in pune road karad and four people from sindhudurg died in accident 
कोकण

भीषण अपघातात सिंधुदुर्गच्या चार कोतवालांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : कराड महामार्गावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल विभागातील चौघा कोतवालांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये निलेश मोंडकर, मनोज परब, अंकुश शिंदे, भरत बोडेकर अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. 

कुंभारमाठ येथील कोतवाल अंकुश देवबा शिंदे यांच्या मृत्यूची बातमी कळताच तालुक्‍यात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूची माहिती मिळाताच त्याचे नातेवाईक व मित्रपरिवार कराड येथे रवाना झाले. अंकुश व त्याचे मित्र असे पाचजण एका खासगी कामासाठी पुणे येथे जात होते. यावेळी अपघात पाचपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील अंकुश याचे आई, वडील मोलमजुरी करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत अंकुश याने कोतवाल पदाची परीक्षा दिली होती. 

अंकुश यांच्या अपघाती निधनामुळे तालुक्‍यात शोककळा पसरली आहे. तसेच वैभववाडी तालुक्‍यातील कोतवाल भरत माळू बोडेकर (वय 30) यांचे नापणे धनगरवाडी येथे घर आहे. ते येथे आठ - दहा वर्षे सेवेत होते. ते अविवाहित असून त्यांच्या पश्‍चात आई, वडील, चार भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT