accident in sangameshwar ratnagiri two people died in sindhudurg 
कोकण

रत्नागिरीत भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्वर (रत्नागिरी) : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर रोड रेल्वेस्टेशनजवळ काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास ट्रक आणि क्वालीस या दोन गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून गाडीत अडकून पडलेल्या क्वालीस चालकाची सुटका करुन त्याला गंभीर जखमी अवस्थेत संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी दिली.

या अपघातात २ जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे मात्र त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. क्वालीस  गाडीचा चालक अपघातानंतर गाडीमध्ये अडकून पडला होता. त्याला वाहनचालक आणि पोलीसांनी गाडी बाहेर काढून गंभीर जखमी अवस्थेत संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक फरार झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. अपघातग्रस्त क्वालीसमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून गाडीत एकूण सात प्रवासी होते. उर्वरित चौघांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताबाबत संगमेश्वर पोलीस मदतकार्य आणि तपास करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT