accident of swift car and two wheeler in oras sindhudurg but no any mortality in accident 
कोकण

बहिणीचा आशीर्वाद पाठीशी म्हणून वाचला भावाचा जीव

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : मळगाव रेडकरवाडी येथे बहिणीला लग्न पत्रिका देऊन न्हावेली येथे माघारी जात असताना स्विफ्ट कारची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दत्ताराम पुंडलीक पार्सेकर (वय ४०, रा. न्हावेली, पार्सेकरवाडी ) हा युवक गंभीर जखमी झाला. झाराप-पत्रादेवी बायपास वर मळगाव जोशी - मांजरेकरवाडी सर्कलवर सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

कोल्हापूरातील राधानगरी येथील नंदकुमार मगदूम हे आपल्या स्वीफ्ट डीझायरने ( एम एच ०९ इ के ९२६५)  कुटुंबीयांसमवेत फोंडा कणकवली मार्गे गोव्याच्या दिशेने निघाले होते. याचवेळी मळगाव सर्कल त्यांच्या गाडीची सर्कल क्रॉस करणाऱ्या दुचाकीला (एम एच ०७ - वाय ६५७४) ला धडक बसल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर खाजगी वाहनाने दुचाकीस्वार दत्ताराम पार्सेकर याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी सावंतवाडीचे माजी सभापती राजू परब, दीपक जोशी, भाऊ गोसावी, सिद्धेश आजगावकर, विजय हरमलकर आदींसह स्थानिक उपस्थित होते. 

स्विफ्टच्या धडकेनंतर दुचाकीस्वार गाडीवरून उडून डीवाईडवर पडल्यामुळे त्याला मोठी दुखापत झाली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली. याची माहिती मिळताच पोलीस बीट अंमलदार शरद लोहकरे यांच्यासह पोलिस घटनास्थळी उपस्थित झाले असून घटनेचा पंचनामा सुरू आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जखमेवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

झाराप पत्रादेवी बायपासच्या दुभाजकावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या गवतामुळे सर्कलवर गाडी वळवताना पलिकडून येणारी गाडी दिसत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत संबंधित विभागाला वारंवार कल्पना देऊनही गवत काढले जात नाही. याबाबत दैनिक सकाळ पाठपुरावा केला होता मात्र बांधकाम विभागाने अद्यापही हे गवत काढले नाही त्यामुळे हे गवत त्वरित न काढल्यास आंदोलन उभारू, असा इशारा माजी सभापती राजू परब यांनी दिला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Latest Marathi News Updates : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्प'; महाराष्ट्रातील अभियांत्रिकी चमत्कार - फडणवीस

SCROLL FOR NEXT