achara health center visit sindhudurg z.p president sanjana sawant 
कोकण

आचरा आरोग्य केंद्रातील प्रश्‍न सोडवू ः सावंत 

महेश बापर्डेकर

आचरा (सिंधुदुर्ग) - नूतन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू असलेल्या कोविड लसीकरण कक्षास अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी येथे लसीकरणाबाबत केलेल्या व्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जाधव यांनी आरोग्य केंद्राच्या समस्यांकडे अध्यक्षांचे लक्ष वेधले. या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 8 मार्चपासून कोविड लसिकरण केंद्र सुरू केले आहे. आज सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांनी या केंद्राला अचानक भेट देऊन आढावा घेतला. लसिकरण मोहिमेबाबत आढावा घेतला. यात प्रतिक्षा केंद्र, नोंदणी केंद्र, नियंत्रण कक्षाची पहाणी केली. या आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या हिरकणी कक्षालाही भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शामराव जाधव, आरोग्य सहाय्यक व्हि. डी. ठाकूर यासह अन्य कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेबाबतच्या अडचणी, अपुरा कर्मचारी वर्ग याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांचे लक्ष वेधले. या समस्या निवारण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT