मालवण ( सिंधुदुर्ग ) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्यानंतर शहरात दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती; मात्र याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 140 हून अधिक दुचाकी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर विनाकारण दुचाकी चालविणाऱ्या 654 वाहनचालकांवर सुमारे 1 लाख 46 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 23 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली. यात जिल्हा प्रशासनाने शहरात दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला. याचे उल्लंघन करणाऱ्यांची वाहने जप्त करण्याची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.
त्यानुसार 23 मार्चपासून शहरात पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी शेखर मुणगेकर, गुरूप्रसाद परब यांनी विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्या दुचाकी जप्त करण्याची कारवाई केली. यात आतापर्यंत सुमारे 140 हून अधिक दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याचबरोबर 23 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत 654 वाहनचालकांवर सुमारे 1 लाख 46 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. यात काही वाहनचालकांकडून 17 हजार 700 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.